नोकरी सोडून "त्याने' केली शेती 

अशोक मुरुमकर
सोमवार, 14 मे 2018

सोलापूर : सध्या अनेक सुशिक्षित तरुण नोकरी नाही म्हणून निराशेत आहेत. तर दुसरीकडे पावसाचा लहरीपणा व शेतमालाचे अनिश्‍चित भाव, यामुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे रोजगार शोधण्यासाठी वळत आहे. अशा स्थितीत एका तरुणाने पुण्यातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला, अन्‌ त्यामध्ये तो यशस्वीही झाला आहे. कष्ट करण्याची तयारी असेल तर काहीच अशक्‍य नसतं, असं त्याने यातून सिद्ध करून दाखवलं आहे. शिवाजी बोराडे असं त्या तरुणाचे नाव आहे.

करमाळा तालुक्‍यातील बिटरगाव (श्री) येथील शिवाजीचे बीसीए झालं आहे. शिक्षण झाल्याबरोबर नोकरीच्या शोधात तो पुण्यात गेला. तिथे एका कंपनीत नोकरी भेटली पण नोकरीत त्याचे मन रमेना. तो म्हणतोय, नोकरीत मन लागेना. हिथं जेवढे कष्ट करतोय तेवढे घरीच शेतीत केलं तरं, असा प्रश्‍न नेहमी सतावत होता. पावसाचा लहरीपणा अन्‌ शेतमालाचे अनिश्‍चित भाव यामुळे आधीच घरचे वैतागत. त्यात आपण दुसरं काय करणार असाही विचार होताच. एकेदिवशी वडिलांकडूनच विचारणा झाली. तुला दुसरा काय व्यवसाय किंवा आणखी शिक्षण घ्यायचे आहे का? त्यासाठी खर्च करायला ते तयार होते. पण तेव्हाच त्यांनी दुसराही पर्याय दिला, तो म्हणजे तुझा खर्च नसेल तर ट्रॅक्‍टर घ्यायचा आहे. त्यावर मी ट्रॅक्‍टर घ्या असा सल्ला दिला. पुढे काही दिवसांनी थेट नोकरी सोडूनच घरी आलो. तेव्हापासून जे कष्ट करायचे ते शेतातच असं ठरवलं. कमी पाण्यात कशी शेती करता येईल यावर विचार करत प्रथम कलिंगड करण्याचा निर्णय घेतला. ठिबकवर पहिला प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे प्रोत्साहन मिळाले. बाकी ऊस अन्‌ इतर पिके घेत गेलो. तेव्हापासून दरवर्षी कलिंगड करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा व्यापारी काय घेईल ती त्याला नेहू द्यायची, पण बाकी लहान-लहान राहिलेले कलिंगड मी स्वत: यात्रा अन्‌ बाजारात जाऊन विकतो. घरचाच ट्रॅक्‍टर असल्याने त्यातून खर्च निघतो. 

निंबोळीपासून खत 
शिवाजी बोराडे म्हणत आहेत. कडुनिंबाच्या निंबोळ्या जमा करून त्याच्यापासून खत तयार करणार आहे. याचा प्रयोग केला तेव्हा पिकावर परिणाम दिसून आला. निंबाच्या झाडाखालच्या पिकावर सुद्धा नेहमी तेज दिसते. त्यामुळे निंबोळ्या गोळा करून त्याचा वापर खत म्हणून करणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा वाचेल.

Web Title: positive story shivaji borade story