मनोरुग्णाला मिळाले जगण्याचे बळ

मनोरुग्णाला मिळाले जगण्याचे बळ

येरवडा - मानसिक आजारातून बरे होऊनही संतोषला (नाव बदलले आहे) कुटुंबीय घरी घेऊन जात नव्हते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारामुळे एका हॉटेलने त्याला नोकरी दिली. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तो तेथे काम करीत आहे. बरे झालेल्या मनोरुग्णाचे राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे पुनर्वसन करण्यात आल्याची माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यांनी दिली. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्तीर्ण झाल्यानंतर संतोष शहरातील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. वडिलांचे निधन झाल्यामुळे तो मानसिक आजारी असलेल्या आई व बहिणीसह राहत होता. दरम्यान, त्याच्यातसुद्धा मानसिक आजाराची लक्षणे दिसू लागली. आजाराची तीव्रता वाढल्याने त्याला येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारामुळे संतोष मानसिक आजारातून बरा झाला. रुग्णालयातील समाजसेविकांनी संतोषला घरी परत पाठविण्यासाठी त्याच्या बहिणीशी पत्रव्यवहार केले. पत्रव्यवहाराला प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी त्याच्या बहिणीच्या घरी जाऊन संतोषला घरी नेण्यास सांगितले. मात्र, बहिणीने त्यास नकार दिला. त्यामुळे बरा होऊनही संतोषला रुग्णालयात राहाणे भाग पडले होते. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव चेतन भगत यांच्या पुढाकाराने संतोषला हॉटेलमध्ये दरमहा सहा हजार रुपयांची नोकरी मिळाली आहे. तेथे त्याच्या राहण्याची व जेवणाची मोफत सोय आहे.  संतोषचे आधारकार्ड काढले असून, त्याचे राष्ट्रीयीकृत बॅंकेत खातेसुद्धा उघडले आहे. त्याला आता हक्काची नोकरी आणि वास्तव्याचे ठिकाण मिळाले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संतोषचे पुनर्वसन झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com