लगद्यापासून भालचंद्र महाराजांची ६.५ फुटी मूर्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

कणकवली - शहरातील बांधकरवाडी येथील ज्येष्ठ मूर्तिकार मारुती पालव यांनी भालचंद्र महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त त्यांची कागदी लगद्यापासून इको फ्रेंडली मूर्ती तयार केली आहे. साडेसहा फूट उंचीचीही आकर्षक मूर्ती बनवली आहे. शनिवार (ता. १४) पासून भालचंद्र महाराजांचा ११३ वा जयंती उत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने श्री. पालव यांनी ही मूर्ती तयार केली आहे.

पालव गुरुजी लहानपणापासून तसेच वयाची पंचाहत्तरी झाली तरी मूर्तिकलेच्या माध्यमातून अभिव्यक्‍त होत आहेत. गणेशमूर्ती, सरस्वती, श्रीकृष्ण तसेच विविध पौराणिक मूर्ती तयार करण्याची त्यांची चित्रशाळाही आहे. गेली अनेक वर्षे ते चार इंचापासून मोठमोठ्या मूर्ती तयार करीत आहेत. यंदा त्यांनी भालचंद्र महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने कागदी लगद्यापासून साडेसहा फूट उंचीची मूर्ती तयार करण्याचा संकल्प केला होता.

सुमारे ७० किलो रद्दीच्या साहाय्याने ते गेले महिनाभर मूर्ती तयार करीत आहेत. कागदाचा लगदा हाताने, बोटाने चेपून, हाताने फिरवून ही मूर्ती करण्यात आली आहे. या मूर्तीचे सध्या रंगकाम केले जात आहे. मूर्ती साकार झाल्यावर मनाला मोठे समाधान झाले. आता कागदी लगद्यापासून आणखी मोठी मूर्ती तयार करू शकतो, असा आत्मविश्‍वास श्री. पालव यांनी व्यक्‍त केला.

Web Title: Pulp from Bhalachandra Maharaj 6.5 feet idol

टॅग्स