ग्रामीण वाचकांसाठी "एक गाव, एक ग्रंथालय' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

पुणे - ग्रामीण भागातील माणसांना वाचनाची गोडी लागावी आणि पुस्तकांचा समृद्ध वारसा त्यांच्यापर्यंत पोचावा, यासाठी "एकलव्य ग्रुप'च्या तरुण-तरुणींनी "एक गाव, एक ग्रंथालय' हा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत समाजातील दानशूर लोकांकडून जुनी-नवी पुस्तके संकलित करण्यात येत आहेत. 15 जुलैपर्यंत ही पुस्तके संकलित केली जाणार असून, या संकलित पुस्तकाच्या माध्यमातून विदर्भातील चार जिल्ह्यांतील पाच गावांमध्ये ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. आतापर्यंत पाच हजार पुस्तके उपक्रमासाठी संकलित केली आहेत. 

या उपक्रमाला "पुणे जागृती ग्रुप', "पुणे पोलिस' आणि "लायन्स क्‍लब'चे सहकार्य मिळत आहे. पुस्तक संकलित करण्याची सुरवात शनिवारी (ता.11) झाली. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जवळजवळ शंभर स्वयंसेवक एकत्र येऊन पुस्तके संकलित करत होती. अमरावती, बुलडाणा, अकोला आणि यवतमाळ येथील पाच गावांमध्ये प्रत्येकी एक ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. 

पुनोती खुर्द (अकोला), जिपापूर (अकोला), मुकिंदपूर-पारधीबेडा (यवतमाळ), फत्तापूर (यवतमाळ) आणि दत्तापूर (सिंदखेड राजा) आदी गावांमध्ये पुस्तकांच्या संकलनातून ग्रंथालय उभारले जाणार आहे. पहिल्या ग्रंथालयाची सुरवात 15 ऑगस्टपासून होणार आहे. 

याबाबत उपक्रमाचे समन्वयक नारायण चापके आणि पूजा कुलकर्णी म्हणाले,"" ग्रामीण भागातील लोकांमध्येही वाचनाची गोडी लागावी, यासाठी हा उपक्रम आम्ही राबवीत आहोत. समाजातील दानशूर लोकांकडून पुस्तके संकलित करून ती ग्रंथालयांसाठी वापरण्यात येणार आहेत. या ग्रंथालयांमध्ये कथा, कांदबऱ्या, कवितासंग्रहासह विविध विषयांची माहिती देणारी पुस्तके असतील. प्रत्येक ग्रंथालयात किमान पाचशे पुस्तके सुरवातीला वाचनासाठी उपलब्ध असतील. पाच गावात ग्रंथालय उभारल्यानंतर राज्यभरातील गावांमध्ये ग्रंथालय उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी लोकांनी आपल्याकडील नवी-जुनी पुस्तके द्यावीत.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news book Library positive news