कमलाबाई पाटील यांची लाखाची देणगी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

पुणे - स्वतः निरक्षर असून शिक्षणाविषयीच्या आस्थेपोटी गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत म्हणून कमलबाई भानुदास पाटील यांनी एक लाख रुपयांची देणगी विद्यार्थी सहायक समितीला नुकतीच दिली. माझ्या शेतीच्या उत्पन्नातील ही बचत असून, समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि भारताचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या गरजू, होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही मदत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘मला शिक्षण मिळाले नाही, परंतु खेडेगावातील गरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत द्यावी,’’ अशी भावना माझे बंधू आणि मार्गदर्शक भाऊसाहेब जाधव यांच्याकडे व्यक्त केली.

त्यांच्यामुळे समितीसारख्या संस्थेची ओळख झाली,’’ असेही त्यांनी यावेळी सांगितले. समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी ही देणगी स्वीकारली. समितीचे विश्‍वस्त भाऊसाहेब जाधव, रमाकांत तांबोळी याप्रसंगी उपस्थित होते.

Web Title: pune news kamlabai patil one lakh donate for student help