तिच्या जिद्दीमुळे मिळाले यश अन्‌ दृष्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

पुणे - दहावीची परीक्षा देण्यासाठी ‘तिचा’ अभ्यास सुरू होता; पण अभ्यासामुळे डोळ्यांच्या नियमित तपासणीकडे दुर्लक्ष झाले आणि परीक्षेच्या काही तास आधी तिची दृष्टी अचानक अंधूक झाली. शस्त्रक्रिया हाच एकमेव मार्ग असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले; पण तिने परीक्षा देण्याचा निश्‍चय केला. एकीकडे दहावीची परीक्षा आणि दुसरीकडे दृष्टी वाचविण्याची धडपड ती करत होती. तिच्यातील आत्मविश्‍वास आणि जिद्दीमुळे ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालीच; पण दृष्टीही परत मिळविली. आकुर्डीतील सलोनी मोरे यांनी ही झुंज दिली आहे. 

सलोनीला पाचवीत असल्यापासून चष्मा होता. दहावीमध्ये शाळा, अभ्यास यातून नियमित तपासणी वेळोवेळी लांबणीवर पडत गेली. दहावीची परीक्षा तोंडावर आली असतानाच दृष्टी अंधूक झाली. नेत्ररोगतज्ज्ञांकडे गेल्यानंतर डोळ्यांच्या पडद्याचा आजार असल्याचे निदान झाले.

दृष्टी वाचविण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणे, हाच एकमेव प्रभावी मार्ग असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले; पण बोर्डाच्या परीक्षेचा पेपर काही तासांवर आला होता. शस्त्रक्रिया केल्यास परीक्षा देता येणार नाही, हा विचार करत तिने अंधूक दिसत असतानाही परीक्षा देण्याचा निर्धार केला. त्यात पूर्ण दृष्टी जाण्याचा धोका होता; मात्र तिची जिद्द पाहून डॉक्‍टरांनी काही स्टिरॉइड्‌स आणि औषधांच्या माध्यमातून तात्पुरते उपचार करण्याचा मार्ग स्वीकारला.

दहा हजार रुग्णांमध्ये एकाला होणारा ‘रेटिनल व्हॅस्क्‍युलिटीस’ हा नेत्रपटलाचा आजार सलोनीला झाला होता. शरीरातील प्रतिकार शक्ती आपल्याच डोळ्यांच्या विरुद्ध काम करण्यास सुरवात करते. त्यामुळे हा आजार होतो किंवा डोळ्यांचा क्षयरोग हे त्यामागचे कारण असते. त्यावर शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय असतो. शस्त्रक्रियेनंतर सलोनीची दृष्टी पूर्ववत झाली. 
- डॉ. आदित्य केळकर, नेत्ररोगतज्ज्ञ, एनआयओ

Web Title: pune news saloni more success story