दोन्ही पाय गमावलेली सायली पुन्हा चालु लागली

पराग जगताप
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

एक वर्षानंतर सायली ढमढेरे ही कृत्रिम पायावर उभा राहून चालू लागली ही बातमी तिला उपचारासाठी मदत करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आनंदाची असुन यामुळे नक्कीच सायलीस मदत करणाऱ्या सर्व ज्ञात व अज्ञात व्यक्तीचा व संघटनेचा दिवाळीचा आनंद व्दिगुणीत होणार आहे.

उदापूर (ता. जुन्नर) : एक वर्षापुर्वी रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेली सायली संजय ढमढेरे (रा. उदापूर, ता. जुन्नर) ही आता परत दोन्ही कृत्रिम पायावर उभे राहुन चालु लागली असून फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात भरारी घेण्यास सायली ढमढेरे सज्ज झाली आहे. 

आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बळावून स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सायली ढमढेरे मुंबईला गेली होती त्यावेळीही परीक्षा देवून परत येतान गुरूवारी दि २० ऑक्टोबर 2016 रोजी कल्याण रेल्वेस्थानकावर तीचा रेल्वे खाली पडून अपघात झाला होता. त्या अपघातात सायलीला दोन्ही पाय गमावावे लागले.आय.ए.एस.होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सायलीला उपचार करून परत उभे राहण्यासाठी सर्वच स्थरातून आर्थिक मदतीची साथ मिळाली.

एक वर्षानंतर सायली ढमढेरे ही कृत्रिम पायावर उभा राहून चालू लागली ही बातमी तिला उपचारासाठी मदत करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आनंदाची असुन यामुळे नक्कीच सायलीस मदत करणाऱ्या सर्व ज्ञात व अज्ञात व्यक्तीचा व संघटनेचा दिवाळीचा आनंद व्दिगुणीत होणार आहे.

सायालीला मदतिसाठी दै. सकाळ व इतर सर्वच वृत्तपत्रांमध्ये, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया अश्या सर्वच माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. त्यास सर्वच स्थरातील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध संस्था व संघटनांनी सढळ हाताने मदत केल्याने सायली वर योग्य उपचार झाले. सध्या सायली उदापूर ता.जुन्नर येथे कृत्रिम पायावर चालण्याचा सराव करत आहे. तसेच जे आय.ए.एस होण्याचे स्वप्न घेवुन सायली ढमढेरे स्पर्धा परिक्षा द्यायला गेली होती आणि हा अपघात झाला तेच स्वप्न तसेच उराशी बाळगत तीने नविन जोमाने परत मोठ्या प्रमाणात अभ्यासाला सुरुवात केली आहे.या एक वर्षाच्या कालावधीच सायलीचा अत्मविश्वास वाढावा म्हणुन शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर, महाराष्ट्र राज्य युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी व इतर विविध क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवरानी सायलीची तिच्या घरी भेट घेवुन तील प्रोत्साहन दिले आहे.

Web Title: pune news sayali dhamdhere story