esakal | जुन्या फर्निचरचा कल्पकतेने कायापालट करणारी कलावंत 
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या फर्निचरचा कल्पकतेने कायापालट करणारी कलावंत 

जुन्या वस्तू टाकून देण्याऐवजी त्यांना पुनर्वापरातून नवं,अनोखं रूप देण्याची आवडनिवड तिला आहे.रमा कुकनूर ही भरतनाट्यम्‌ नृत्यांगना डॉ. सुचेता चापेकर यांची शिष्या आहे

जुन्या फर्निचरचा कल्पकतेने कायापालट करणारी कलावंत 

sakal_logo
By
नीला शर्मा

रमा कुकनूर ही भरतनाट्यम्‌ नृत्यांगना डॉ. सुचेता चापेकर यांची शिष्या आहे. कलेतून विकसित होणारी सौंदर्यदृष्टी तिला घरातल्या सजावटीसाठी उपयोगी पडते. जुन्या वस्तू टाकून देण्याऐवजी त्यांना पुनर्वापरातून नवं, अनोखं रूप देण्याची आवडनिवड तिला आहे. अलीकडेच तिने लाकडी वस्तूंचा कायापालट केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रमा कुकनूर हिने अनेकदा रंगमंचावर तिची कला सादर केली आहे. उत्तम गुरू जीवन सर्व प्रकारे उन्नत जगायचे धडे देत असतात. घरात पालकांकडून तसंच बाळकडू मिळालं असेल तर बालपणीच कलेकडे ओढा निर्माण होतो. दैनंदिन आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींना अशीच कलात्मकतेची जोड देण्याची गोडी रमालाही लागली. ती म्हणाली, ""चित्रकलेत मला लहानपणापासूनच रुची होती. त्यात सातत्य नसलं तरी मनात आल्याबरोबर मी चित्रं काढायला बसायचे. यातून घरातल्या वस्तू, पोशाख वगैरेंबाबतच्या रंगसंगतीबाबत कळत-नकळत सतर्कता वाढीस लागली.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रमाने असंही सांगितलं की, मी शाळेत असताना दिवाळीत माझे बाबा अजय कुकनूर यांच्याबरोबर आकाशकंदील करायचे. गणेशोत्सवात घरी आम्ही सजावट करायचो. त्यामुळे रंगसंगती ही संकल्पना फार लवकर अंगवळणी पडली. तेव्हा चित्रकलेची प्रारंभिक परीक्षाही दिली होती. रोज नेटाने चित्रकलेचा सराव नव्हता, पण मनात आलं की, लगेच कागद, पेन्सिल व रंग घेऊन बसायचे. लग्नानंतर एकदा जुन्या लाकडी कपाटाला नुसता रंग देण्यापेक्षा त्यावर चित्रकलेचा प्रयोग करून पाहिला. तो सगळ्यांना आवडला. मग जुन्या वस्तूंचं रंगरूप बदलून त्या नवं करण्यातली गंमत अधूनमधून अनुभवत गेले. अलीकडेच स्वयंपाकघरातील ट्रॉलीवर वारली पद्धतीने चित्रांचा साज चढवला. मग दोन जुन्या चौरंगावर अगदीच वेगवेगळ्या चित्रांचा वापर केला. एकावर बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे प्रमाणबद्ध काळे-पांढरे चौकोन चितारले. यावर कधी-कधी आम्ही बुद्धिबळ खेळतो, तेव्हा मौज वाटते. दुसऱ्या चौरंगावर छोट्या-छोट्या चौकटींमध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील चित्रं काढली. फॅब्रिक व ऍक्रिलिक रंग मी असे फर्निचर किंवा कपड्यांवर वापरते. त्यावेळी नृत्यातल्यासारखीच ध्यानमग्न अवस्था होते.