सेवानिवृत्तीनंतर वाहिले ज्येष्ठांच्या सेवेत

Ratnakar-Raut
Ratnakar-Raut

नागपूर - सेवानिवृत्तीनंतर कुटूंब व नातेवाइकांच्या गोतावळ्यात सुखासमाधानाने उर्वरित आयुष्य काढणारे शेकडो जण आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात. पण काही जण अपवादही आहेत. रत्नाकर राऊत हे अशाच व्यक्‍तींपैकी एक. त्यांनी निवृत्तीनंतर चार भिंतीच्या आड आयुष्य न घालविता समाजाच्या भल्यासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांचे एकूणच सामाजिक कार्य इतरही ज्येष्ठांसाठी आदर्श व प्रेरणादायी ठरले आहे.

75 वर्षीय रत्नाकर राऊत 2001 मध्ये जीवन शिक्षण विद्‌यालयातून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. समाजऋण फेडण्याच्या उद्‌देशाने त्यांनी स्वत:ला ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सेवेत वाहून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या समाजसेवेला माजी खासदार दत्ता मेघे यांची साथ लाभली. मेघे यांनी स्थापन केलेल्या विदर्भ प्रदेश विकास परिषदेच्या ज्येष्ठ नागरिक सेलची जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपली "सेकंड इनिंग' सुरू झाली. या माध्यमातून त्यांनी ज्येष्ठांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम सुरू केलेत. गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे ते सेवा करीत आहेत. रत्नाकर राऊत दर मंगळवारी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात नागपूर व विदर्भातील ज्येष्ठांना बसने घेऊन जातात. तिथे त्यांच्या नि:शुल्क नेत्र, शुगर, इसीजी व अन्य वैद्‌यकीय तपासण्या करून घरी सोडून देतात. त्यांच्या जेवणाचीही नि:शुल्क व्यवस्था केली जाते. शिवाय आवश्‍यकता भासल्यास त्यांच्यावर औषधी व उपचार केले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com