ब्रेनडेड रवींद्रमुळे चौघांना जीवदान

परशुराम कोकणे  
मंगळवार, 24 जुलै 2018

सोलापूर - अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या रवींद्र श्रीरंग शिंगाडे यांच्या अवयवदानाची प्रक्रिया आज (सोमवारी) दुपारी पार पडली. ग्रीन कॉरिडॉर करून रवींद्रचे हृदय हेलिकॉप्टरमधून, तर किडनी, स्वादुपिंड, यकृत हे अवयव रुग्णवाहिकेतून पुण्यातील रुग्णालयांत पोचवले. ब्रेनडेड रवींद्रमुळे चौघांना जीवनदान, तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. 

रवींद्र शिंगाडे यांचा २० जुलै रोजी सोलापूर- पुणे महामार्गावर अपघात झाला होता. रवींद्रला यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रवींद्रचा मेंदू मृत झाल्याची कल्पना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाइकांना दिली. आवश्‍यक त्या चाचण्या केल्यानंतर रविवारी रवींद्रचा मेंदू मृत असल्याचे निश्‍चित झाले. वैद्यकीय अधिकारी, अवयव प्रत्यारोपण समन्वयकांनी रवींद्रच्या नातेवाइकांना अवयवदानाविषयी समुपदेशन केले. 

...हे अवयव केले दान
यशोधरा रुग्णालयापासून होटगी रस्त्यावरील विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता.  दुपारी दोन वाजता रुग्णालयातून हृदय घेऊन निघालेली रुग्णवाहिका काही मिनिटांत विमानतळावर पोचली. रवींद्रचे हृदय हेलिकॉप्टरमधून पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथे नेण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून एक किडनी व स्वादुपिंड हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, यकृत आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये, दोन्ही डोळे सोलापूरच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. सोलापूर ते पुणे रस्त्यावरही ग्रीन कॉरिडॉर केला. रवींद्रचे एक मूत्रपिंड यशोधरा हॉस्पिटलमधील रुग्णास देण्यात आले.

Web Title: ravindra shingade Organ donation