रिक्षावाला नव्हे, हिम्मतवाला...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

सांगली - धावत्या ट्रकमध्ये उडी घेऊन तो थांबवत नागरिकांचे जीव वाचवणारा रिक्षाचालक इम्रान मुल्ला खरा हिम्मतवाला आहे, अशा शब्दांत त्याचा गौरव करण्यात आला. प्रकाश चक्रदेव रिक्षा मित्रमंडळ थांब्यावर शिवसेना नेते पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्याचा सत्कार झाला. 

‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मृत्यू एक पावलावर होता’ या वृत्तामुळे अनेकांनी इम्रानची भेट घेऊन त्याच्या धाडसाचे कौतुक केले. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता एसटी स्टॅंडसमोर ट्रकचालकाला फिट आल्याने तो ट्रकमधून खाली पडला आणि ट्रक तसाच धावत राहिला. त्यावेळी इम्रानने ट्रकमध्ये उडी घेत तो थांबवला व कित्येकांचे प्राण वाचवले. याबद्दल हा गौरव करण्यात आला. 

पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘कष्ट, सचोटी, प्रामाणिकपणाने व्यवसाय करणारे रिक्षावाले हे समाजाचा कान आणि डोळा आहेत. त्याची चौफेर नजर समाजहिताचे काम नेहमीच करत असते. इम्रानने धाडस दाखवून ट्रक थांबवला नसता तर कित्येकांना जीव गमवावा लागला असता. त्याचे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडसाने ट्रक थांबवला. रिक्षावाल्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अशा घटनांतून अधिक चांगला होईल.’’

ट्रकचे मालक अरुण बावधनकर, संभाजी सूर्यवंशी, राजाराम बोंद्रे, सांगली जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे नेते महादेव पवार, सुलेमान शेख, सचिन शिंदे, राजू पवार आदी उपस्थित होते.

Web Title: rickshaw driver life saver