मावळातून परदेशात जातोय गुलाबातून प्रेमाचा संदेश 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

कामशेत - प्रेमाचा ऋणानुबंध घट्ट करणारा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे या दिवसासाठी परदेशात गुलाबांच्या फुलांना अधिक मागणी असते. मावळ तालुक्‍यातील फूल उत्पादकांची फुले पाठविण्यासाठी लगबग 28 जानेवारीपासून सुरू झाली होती. तालुक्‍यातून परदेशात सुमारे एककोटी फुलांची निर्यात झाली आहे. लाल गुलाबाला अधिक मागणी आहे.

परदेशातील एक्‍स्पोर्ट क्वालिटीचे नियम कटक केल्याने या वर्षी त्याचा फटका बसला आहे. 
व्हॅलेंटाइन डेसाठी युरोपीय देशात हॉलंडच्या बाजारपेठेतून फुले जातात. त्यामुळे मावळातून फुले पाठविण्यास जानेवारीपासूनच सुरवात झाली होती. यामध्ये लाल गुलाबांची सर्वाधिक निर्यात केली आहे. तालुक्‍यातील इस्सार ऍग्रोटेक, डेक्कन फ्लोराबेस, सिद्धार्थ फ्लोरा, सोएक्‍स फ्लोरा, कोठारी, प्रोफेशनल ऍग्रो, श्री एंटरप्रायझेस, ड्यू डॉप या कंपन्यांचा फुले पाठविण्यात समावेश होता. 40 सेंटिमीटरला 6 रुपये, 50 सेंटिमीटरला 10, तर 60 सेंटिमीटरला 11 असा दर परदेशात मिळाला आहे. 

पुणे जिल्हा फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे यांनी "सकाळ'ला माहिती देताना सांगितले, की या वर्षी परदेशात एक्‍स्पोर्ट क्वालिटीचे नियम कडक केल्याने त्याचा फटका फूल उत्पादकांना बसला असून, दरही कमी मिळाला आहे. मावळ तालुक्‍यात एमआयडीसी व इतर भागात मिळून सुमारे एक हजार एकरावर फूल शेती आहे. फूल उत्पादक कंपन्या व शेतकऱ्यांसाठी व्हॅलेंटाइन डे हा सुगीचा कालावधी मानला जातो. 8 फेब्रुवारीनंतर भारतीय बाजारपेठेत फुले पाठविण्यात येणार असून, त्या ठिकाणी 8 ते 10 रुपये दर मिळेल, अशी अपेक्षा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rose of love message