हॉटेल व्यवसाय सांभाळून ऋत्विज रमलाय चित्रकलेत ! 

परशुराम कोकणे - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

सोलापूर - शालेय जीवनापासून चित्रकलेची आवड असणाऱ्या ऋत्विज चव्हाण याने वडिलांचा हॉटेल व्यवस्थापनाचा व्यवसाय सांभाळत आपली कला जोपासली आहे. चित्रकला हे मानसिक योगा असल्याचे ऋत्विजचे म्हणणे असून आपली चित्रे जगभर पोचावीत, या उद्देशाने त्याने संकेतस्थळावर ऑनलाइन प्रदर्शन सुरू केले आहे. 

वडील अनिल आणि आई अनुजा चव्हाण यांनी लहानपणापासूनच ऋत्विजमधील चित्रकलेची आवड ओळखून त्याला प्रोत्साहन दिले. ऋत्विजचे शालेय शिक्षण "ज्ञान प्रबोधिनी'मध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्‍वर महाविद्यालयात झाले. त्यानंतर पुण्यात हॉटेल मॅनेजमेंट आणि मास्टर्स इन पर्सनल मॅनेजमेंट या विषयांचे प्रशिक्षण घेतले. वडिलांचा हॉटेलचा व्यवसाय सांभाळत ऋत्विजने चित्रकलेची आवड जोपासली आहे. ऋत्विज हा ऍक्रेलिकच्या माध्यमातून चित्र रेखाटतो. 2006 मध्ये पुण्यातील बालगंधर्व सभागृहात आणि 2009 मध्ये सोलापुरातील शुभराय आर्ट गॅलरीमध्ये ऋत्विजच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. नवीन माध्यमाचे महत्त्व ओळखून ऋत्विजने आपल्या चित्रांचे ऑनलाइन प्रदर्शन सुरू केले आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी www.rutvijarts.com या संकेतस्थळाला भेट देता येईल. ऋत्विजने रेखाटलेली चित्रे घरात आणि दुकानात नेमकी कशी दिसतील, हेही ऑनलाइन पाहता येणार आहे. 

Web Title: rutvij interest in painting