आपत्कालीन परिस्थितीत धावला वाईतील जैन समाज

आपत्कालीन परिस्थितीत धावला वाईतील जैन समाज

वाई (जि.सातारा) ः कोरोनाच्या संकटात अत्यवस्थ रुग्णांसाठी रेमडेसिव्हर हे इंजेक्‍शन अत्यंत गुणकारी व प्रभावी ठरले आहे. वाईच्या कोविड सेंटरसाठी ही इंजेक्‍शन अत्यंत आवश्‍यक होती. किंमत जास्त असल्याने सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही. त्याकरिता समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे आणि आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक दीपक ओसवाल यांच्या पुढाकाराने जैन बांधवांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीची 25 इंजेक्‍शन उपलब्ध करून दिली आहेत. मानवतावादी दृष्टिकोनातून जैन समाजाने केलेली ही मदत कौतुकास्पद असून, यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी, असे गौरवोद्‌गार आमदार मकरंद पाटील यांनी काढले.
अध्यक्ष... बाप्पांचा उत्सव जवळ आलाय, हे वाचा 

आमदार पाटील यांच्या हस्ते नुकतीच ही इंजेक्‍शन्स ग्रामीण रुग्णालयाकडे देण्यात आली. यावेळी सरपंच हिराशेठ जैन, पोपटलाल ओसवाल, चंदूलाल गांधी, कांतिलाल जैन, प्रांताधिकारी संगीता राजापूकर- चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप यादव, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, ""ज्या-ज्या वेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, त्या-त्या वेळी वाईतील जैन समाज मदतीला धावून आला आहे. नगरसेवक दीपक ओसवाल यांच्याकडे काय मदत करता येईल, अशी विचारणा केली असता त्यांनी तत्काळ जैन बांधवांकडून दीड लाख रुपयांची मदत देण्याचे कबूल करून लगेचच 25 इंजेक्‍शन उपलब्ध करून दिली.

कृष्णा नदीवर 'येथे' बांधला जाणार नवीन पूल; 13 कोटी मंजूर

व्याजवाडीच्या स्नेहलचा आयर्लंडमध्ये झेंडा, कोरोना लस संशोधनासाठी निवड

दीपक ओसवाल म्हणाले, ""आपत्तीच्या काळात सामाजिक जाणिवेतून संपूर्ण भारतात जैन समाजाने नेहमीच पुढे होत मदतीचा हात दिला आहे. लॉकडाउन असताना समाजाने गोरगरिबांना, मजुरांना दोन वेळचे जेवण पुरवले आहे. आमदार पाटील यांनी ज्या-ज्या वेळी मदतीचे आवाहन केले, त्या-त्या वेळी जैन समाजाने भरीव स्वरूपात मदत केलेली आहे. जिओ और जिने दो, या शिकवणुकीनुसार ही मदत जैन समाज देत आहे.'' या वेळी शांतिलाल ओसवाल, उत्तम ओसवाल, मदनशेठ ओसवाल, कैलाश भंडारी, राजूशेठ भंडारी, भरत गांधी, भवरशेठ, प्रवीण जैन, खुशालशेठ ओसवाल, दिलीप ओसवाल, सुरेश ओसवाल, रमेशशेठ ओसवाल, हेमंत जैन आदी उपस्थित होते. सोनाना खेतलाजी ट्रस्टच्या वतीने राजूशेठ भंडारी यांनी यावेळी दोन इंजेक्‍शनची देणगी जाहीर केली.

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सेवानिवृत्त महिला पोलिस उपनिरीक्षकही; सकाळ रिलीफ फंडाला दिली मदत

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com