‘अंनिस’, ‘लायन्स क्‍लब’ने वेचले १५ पोती प्लॅस्टिक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

सातारा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व लायन्स क्‍लबच्या कार्यकर्त्यांनी रविवारी कास येथे श्रमदान करून सुमारे १५ पोती प्लॅस्टिक कचरा वेचला. 

सातारा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व लायन्स क्‍लबच्या कार्यकर्त्यांनी रविवारी कास येथे श्रमदान करून सुमारे १५ पोती प्लॅस्टिक कचरा वेचला. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, सातारा शाखेच्या कार्याध्यक्ष प्रा. प्रमोदिनी मंडपे, भगवान रणदिवे, वंदना माने, डॉ. दीपक माने, मीना महामुनी, साकेत पतके, आनंदा सणस आदी कार्यकर्त्यांनी श्रमदान केले. ‘सकाळ’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या कास स्वच्छता मोहिमेचे समन्वयक डॉ. दीपक निकम व नरेंद्र जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. लायन्स क्‍लब ऑफ सातारा युनायटेडचे अध्यक्ष शशिकांत पाटील, प्रभाकर आंबेकर, प्रा. डॉ. जगताप, बाळासाहेब शिरकांडे, नरेंद्र रोकडे, अनिल कदम, राजाभाऊ खडतरे, दिनकरराव पवार, राजेंद्र निकम, उमेश जाधव, जगदीश राजपुरोहित, रामुगडे, राजमाने, स्वाती जाधव, कमल शिरकांडे यांनी श्रमदानात भाग घेतला. दरम्यान, कास येथे प्रत्येक रविवारी सकाळी साडेसात ते दहा या वेळात श्रमदान चालते. 

इच्छुक नागरिक, संस्था, मित्र मंडळे, भिशी ग्रुप यांनी श्रमदानात सहभागी होण्यासाठी ९८८११३३०८५ या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: satara news anis lions club plastic garbage collected