लिंबचा निखिल झाला इस्रोमध्ये शास्त्रज्ञ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

सातारा - गाव सातारा तालुक्‍यातील लिंब. तटपुंजी शेती, वडील खासगी कंपनीत नोकरीस. तशी एकूणच परिस्थिती नाजूक. मात्र, शिक्षणाची इच्छा, जिद्द असली, की परिस्थिती कधी आड येत नाही हे मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या निखिल पोपटराव शिंदे याने सिद्ध केले आहे. निखिलची नुकतीच इस्रोच्या अंतरिक्ष विभागात संशोधक अभियंतापदी निवड झाली आहे. 

शेतकरी कुटुंबात निखिलचा जन्म झाला. मात्र, घरची शेती अतिशय कमी असल्याने त्याचे वडील साताऱ्यात राहून एका खासगी कंपनीत नोकरी करतात. आई, एक भाऊ, वडील असे निखिलचे छोटे कुटुंब, तरीही आर्थिक परिस्थिती तशी नाजूक. मात्र निखिल लहानपणापासूनच हुशार होता. शिकून मोठे व्हायची जिद्द त्याने लहानपणापासूनच बाळगली होती. येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात मराठी माध्यमातून त्याचे शिक्षण झाले. दहावीनंतर कऱ्हाडच्या शासकीय तंत्रनिकेतनमधून त्याने पदविका अभ्यासक्रम विशेष गुणवत्तेसह पूर्ण केला. त्या वेळी त्याला नामवंत कंपनीत नोकरी मिळत होती. मात्र, त्याने पुण्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. ‘डिस्टिंक्शन’मध्ये इंजिनिअर झाला. या वेळीही त्याला उत्कृष्ट नोकरी मिळाली 
असती मात्र त्याची शिक्षणाची भूक वाढली होती. 

सूरत येथील एनआयटीमधून त्याने एमटेक केले. त्यानंतर त्याने २०१६ मध्ये इस्रोच्या स्पर्धा परीक्षा दिली आणि त्यातील यशामुळे त्याची इस्रोमध्ये अंतरिक्ष विभागात संशोधक अभियंता म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्धल त्याचे समाजाच्या सर्व स्तरांतील मान्यवर आणि नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news nikhil shinde isro scientist