esakal | साताऱ्यात प्रामाणिकतेचे दर्शन! सासपडेच्या शिक्षकाने सापडलेल्या मोबाईलसह रोख रक्कम केली परत
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

सध्या किरण यादव हे कामेरी-फत्त्यापूर (ता. सातारा) येथील शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालयात कार्यरत आहेत.

साताऱ्यात प्रामाणिकतेचे दर्शन! सासपडेच्या शिक्षकाने सापडलेल्या मोबाईलसह रोख रक्कम केली परत

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : प्रामाणिकपणाचे दर्शन घडविताना एका शिक्षकाने सापडलेल्या दोन मोबाईलसह रोख रक्कम संबंधितास परत केली. या कृतीचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. 

किरण निवृत्ती यादव असे या शिक्षकाचे नाव आहे. ते सातारा तालुक्‍यातील सासपडे गावचे रहिवासी आहे. सध्या ते कामेरी- फत्त्यापूर (ता. सातारा) येथील शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालयात कार्यरत आहेत. सातारा येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालय परिसरातून जात असताना त्यांना रस्त्याकडेला एक पिशवी पडलेली दिसली. त्यात दोन मोबाईल, दुचाकीचे भाग व रोख रक्कम होती. मोबाईल बंद स्थितीत असल्यामुळे संबंधिताचा संपर्क साधणे कठीण ठरले. मग श्री. यादव यांनी मिळालेल्या साहित्याबाबत एक पोस्ट तयार करून ती "व्हॉटस अप'च्या विविध ग्रुपवर शेअर केली. 

वनाधिकाऱ्यांकडून अपमान; ग्रामस्थांसह महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांत संताप

याच दरम्यान, अंगापूर येथील अतुल मिस्त्री यांच्या वाचनात ही पोस्ट आली. त्यांचे मित्र दशरथ डोंबाळे (भावेनगर, ता. कोरेगाव) यांचे मोबाईलसह रोख रक्कम असलेली पिशवी हरविल्याची माहिती त्यांना होती. पोस्ट वाचल्यानंतर त्यांनी डोंबाळे यांना पिशवी सापडल्याचे सांगितले. वस्तूंची खात्री झाल्यावर श्री. यादव यांनी सर्व वस्तू डोंबाळे यांना सुपूर्द केल्या. त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. "मोबाईल बंद असल्यामुळे संबंधितांशी संपर्क साधणे अवघड होते. अशा स्थितीत व्हॉटसऍपची मोठी मदत झाली. संबंधिताचे साहित्य परत करता आले याचा मनोमन आनंद वाटतो,' असे किरण यादव यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top