भंगार स्कूटरच्या मदतीने फवारणी यंत्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

कऱ्हाड - घरात बंद पडलेली किंवा भंगारातील स्कूटर असेल तर आता त्यावर फवारणी यंत्र बसवता येईल. हा शोध येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लावला आहे. त्यातून अवघ्या 
१५ हजारांच्या स्कूटवरून सात लाख रुपये किंमतीच्या ट्रॅक्‍टर फवारणीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होणार आहे. 

यांत्रिक विभागातील आशिष हतकर, सचिन कोल्हे, शामली लाले, अक्षय मुटकुळे, जुबेर मुल्ला यांनी त्याचा शोध लावला आहे. वाढत्या महागाईत शेतकऱ्यांना करावा लागणारा सामना व त्याची अवस्था लक्षात घेतल्यास स्कूटरवरील फवारणी यंत्र सुलभ आहे. त्यासाठी स्कूटरच्या इंजिनचा पॉवर वापर केला आहे. त्यात पिस्टन स्प्रेअरच्या मदतीने फवारणी केली जाते. गाडीवरच टाकीची रचना केली आहे. त्यातून ३५ गुंठे फवारणी होते. 

त्यासाठी एक लिटर पेट्रोल लागते व ते काम फक्त एकाच माणसाच्या मदतीने होते. द्राक्ष, आंबा, फळे व अन्य पिकांनाही ते फवारणी यंत्र उपयोगी पडणार आहे. अन्य महागाईच्या फवारणी पद्धतीला हा स्वस्तातील मार्ग अत्यंत चांगला ठरणार आहे. आता ट्रॅक्‍टरचा खर्च शेतकऱ्यांना न परवडण्यासारखा आहे. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.

प्रकल्पाला प्रा. एन. व्ही. साळी यांनी मार्गदर्शन केले. या फवारणी यंत्राची यशस्वी चाचणीही करण्यात आली आहे. यांत्रिक विभागप्रमुख डॉ. सुहास मोहिते, प्लेसमेंट ऑफिसर डॉ. अनिल आचार्य यांनीही प्रकल्पाचे कौतुक केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scrab scooter Sprayer machine motivation