परिस्थितीशी संघर्ष करीत शीला शिंदेच बनल्या आधार

प्रशांत बर्दापूरकर
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

अंबाजोगाई - वेदना, दु:ख, चिंता, संकट कोणाच्या वाट्याला येऊ नये असे म्हटले जात असले तरी नशिबाने या सगळ्याच गोष्टी एखाद्याच्या पदरी पडतात; मात्र कोसळून जाण्यापेक्षा शेतकरी पतीच्या आत्महत्येनंतर धाडसाने सावरत स्वत: आत्मनिर्भर बनून कुटुंब आणि शेतीचा भार उचलणाऱ्या शीला शिंदे यांची कहाणी खचलेल्यांसाठी प्रेरणादायी आहे. 

अंबाजोगाई - वेदना, दु:ख, चिंता, संकट कोणाच्या वाट्याला येऊ नये असे म्हटले जात असले तरी नशिबाने या सगळ्याच गोष्टी एखाद्याच्या पदरी पडतात; मात्र कोसळून जाण्यापेक्षा शेतकरी पतीच्या आत्महत्येनंतर धाडसाने सावरत स्वत: आत्मनिर्भर बनून कुटुंब आणि शेतीचा भार उचलणाऱ्या शीला शिंदे यांची कहाणी खचलेल्यांसाठी प्रेरणादायी आहे. 

गित्ता (ता. अंबाजोगाई) येथील शीला निवृत्ती शिंदे यांनी स्वत: दोन मुलींचे विवाह केले असले तरी त्यांचा संघर्ष सुरूच आहे; मात्र त्या डगमगलेल्या नाहीत. पंढरपूर येथील शीलाबाईंचा विवाह १९८८ मध्ये गित्ता येथील शेतकरी निवृत्ती शिंदे यांच्याशी झाला. लग्नानंतर कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर निवृत्तीरावांनी १९९३ मध्ये दोन खोल्या बांधून संसारगाडा सुरू केला. पुढे त्यांना अश्विनी, शीतल, अनुजा व निकिता या चार मुली झाल्या.

वाट्याला आलेल्या शेतीवरच उदरनिर्वाह चालत असे. यावर भागत नसल्याने सालगडी म्हणून त्यांनी काम केले. या काळात अश्‍विनी या मुलीच्या लग्नामुळे त्यांच्यावर झालेल्या कर्जफेडीच्या विवंचनेतून त्यांनी २४ जून २०१० मध्ये जीवनयात्रा संपविली; मात्र तेव्हापासून शीलाबाईंचा संघर्ष सुरू झाला. त्यांनी मुलींचे शिक्षणही केले. शीलाबाईंनी दुसऱ्यांची जमीनही बटाईने केली. मजुरीनेही कामे केली. 

अनुजा व निकिता या चार मुली झाल्या. वाट्याला आलेल्या शेतीवरच उदरनिर्वाह चालत असे. यावर भागत नसल्याने सालगडी म्हणून त्यांनी काम केले. या काळात अश्‍विनी या मुलीच्या लग्नामुळे त्यांच्यावर झालेल्या कर्जफेडीच्या विवंचनेतून त्यांनी २४ जून २०१० मध्ये जीवनयात्रा संपविली; मात्र तेव्हापासून शीलाबाईंचा संघर्ष सुरू झाला. त्यांनी मुलींचे शिक्षणही केले. शीलाबाईंनी दुसऱ्यांची जमीनही बटाईने केली. मजुरीनेही कामे केली.

कर्जमाफी नाही
पतीच्या निधनानंतर शीलाताई यांनी बॅंक ऑफ बडोदाकडून २०१६ मध्ये ७० हजार रुपये पीककर्ज घेतले; परंतु कर्जमाफीचा ऑनलाइन अर्ज भरूनही या माफीच्या यादीत त्यांचा समावेशच झाला नाही.

जोडव्यवसाय
शीलाबाईंनी बचतगटाकडून कर्ज घेऊन दाळ व पिठाची मिनी चक्की घेतली. नंतर घरगुती साड्या विक्रीही केल्या. आता त्या आणि लहान मुलगी निकिता या दोघींचे कुटुंब आहे. यावर्षी निकिता दहावी उत्तीर्ण झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sheela Shinde Success Story Motivation