esakal | सरपंच झाल्यानंतरही रुग्णवाहिका चालक
sakal

बोलून बातमी शोधा

शेलगाव (ता. खेड) - सरपंच नागेश आवटे हे रुग्णवाहिका चालविताना.

सरपंच झाल्यानंतरही रुग्णवाहिका चालक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चाकण - शेलगाव (ता. खेड) येथील नागेश नवनाथ आवटे (वय २२) हे एक वर्षापूर्वी शेलगावचे लोकनियुक्त सरपंच झाले आहेत. सरपंच होण्याअगोदर शिक्षण घेत असताना स्वतःची रुग्णवाहिका ते चालवीत होते. आता सरपंच झाल्यानंतरही अपघातग्रस्तांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका चालक म्हणून आवटे सेवा देत आहेत. 

चाकण-शिक्रापूर राज्यमार्ग वर्दळीचा असल्याने; तसेच अवजड वाहनांबरोबर इतर वाहने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करत असल्याने सातत्याने या रस्त्यावर अपघात होतात. शेलगाव रस्त्यावर असल्याने याचा अनुभव अगदी लहानपणापासून आवटे यांना आहे. अपघात झाल्यानंतर बघ्यांची गर्दी व्हायची; पण मदतीला कोणी नसायचे. कोणाच्या वाहनात अपघातग्रस्त जखमीला न्यायचे म्हटले तर कोणी वाहन थांबवीत नव्हते. यामुळे अनेकांचे प्राण जायचे. वेळेत उपचार मिळाले तर अपघातग्रस्त वाचू शकतो याचा विचार करून सरपंच आवटे यांनी २०१५ मध्ये रुग्णवाहिका घेतली. चांगली सेवा देण्यासाठी चालक न ठेवता अहोरात्र स्वतः रुग्णवाहिका चालविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. 

सध्या माझ्याकडे चार रुग्णवाहिका आहेत. मी धंदा करत नाही. एक सेवा म्हणून माफक दरात ना नफा, ना तोटा या तत्त्वात रुग्णवाहिका चालवितो. चालकही ठेवले आहेत. मी स्वतःही चालवितो. रुग्णवाहिकांची तत्पर सेवा असल्याने कॉल आल्यानंतर तसेच अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिका वेळेत पोचेल असे पाहिले जाते. अगदी रुग्णांना तसेच मृतदेहही बाहेर राज्यांत नेले जातात. 
- नागेश आवटे, सरपंच,  शेलगाव 

loading image