सेंद्रीय भाज्या, फळे, मसाले घरपोच! 

सेंद्रीय भाज्या, फळे, मसाले घरपोच! 

देशातील लोक खाद्यपदार्थांबाबत जागरूक होत असून, प्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी सेंद्रीय पदार्थांची मागणी वाढते आहे. ग्राहकांची ही गरज व कल ओळखून श्रीया नहेता यांनी ‘झामा ऑग्रेनिक्स’ नावाने स्टार्टअप सुरू केले. शेतकऱ्यांकडून माल विकत घेत तो वर्गीकरण करून थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्याच्या त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून, तो ग्राहक व शेतकरी या दोघांच्याही फायद्याचा ठरतो आहे... 

देशात गेल्या काही वर्षांत स्टार्टअप संस्कृती मूळ धरू लागली आहे. त्यामध्ये युवकांचा कल अधिक प्रमाणात दिसून येतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसायाची अनोखी संकल्पना याचा उत्तम ताळमेळ साधत देशात विविध क्षेत्रांमध्ये स्टार्टअप सुरू होत आहेत. आपल्या मातीतील लोकांसाठी काम करणाऱ्या स्टार्टअप्सना अधिक मागणी असून, त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो आहे. त्यातील एक आघाडीचे आणि शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करून नावलौकिक मिळवलेले नाव म्हणजे श्रीया नहेता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

श्रीया यांनी सेंद्रिय पदार्थ बटणाच्या क्लिकवर भारतातील विविध लोकांना उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने ‘झामा ऑर्गेनिक्सची’ स्थापना २०१७मध्ये केली. हेल्थ कॉशस लोक आता रासायनिक पद्धतीने तयार केलेली उत्पादने टाळून सेंद्रीय पदार्थांना प्राधान्य देत आहेत. त्यांची नेमकी हीच गरज ओळखून श्रीया यांनी या स्टार्टअपची सुरवात केली. भारतात ५० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे जाळे त्यांनी तयार केले व या स्टार्टअपच्या माध्यमातून मुंबईतून देशभरात उत्पादने पोचवण्याचे काम सुरू केले. पुणे, नाशिक, बंगळूर, सुरत, भोपाळ व उत्तराखंडातील शेतकरी त्यांचा माल पाठवतात. मुंबईत कंपनीचे २ हजार ५०० ग्राहक असून, रिटेल व इ-कॉमर्स पार्टनर्सच्या मदतीने दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, पणजी, पुणे आदी शहरांतही सेवा पुरवली जाते आहे. स्थापना झाल्यापासून कंपनीचा व्यवसायात तिप्पट वाढ झाली असून, पाचपट वाढीचे ध्येय ठेवण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘झामा ऑर्गेनिक्स’मध्ये उत्पादनांच्या ताजेपणाला विशेष महत्त्व दिले जाते. शेतकऱ्यांचे कापणीचे वेळापत्रक ध्यानात घेऊन वितरणाचे नियोजन केले जाते. शेतकऱ्यांच्याच सहकार्याने धान्ये, मसाले, भाज्या आणि फळांची यादी तयार केली जात असून, उपलब्धतेनुसार किंवा काढणीच्या चक्रानुसार ‘झामा’च्या पोर्टलवर त्यांची नोंद केली जाते. शेती उत्पादने पहाटे १ ते ३ या दरम्यान मुंबईतील गोदामात पोचवण्याची व्यवस्था केली जाते. कंपनीचे निष्णात कर्मचारी चव आणि तिच्या पिकविण्यातील वैशिष्ट्यांनुसार भाज्यांची गुणवत्ता तपासतात. वर्गीकरणाचे हे काम गुणवत्ता आणि दर्जा राखण्यातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा असतो. संध्याकाळपर्यंत सर्व भाज्या आणि फळांचे पॅकिंग करून ग्राहकांच्या घरी पोचवले जाते. ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांचा माल दलालांविना ग्राहकांपर्यंत पोचवत हे स्टार्टअप देशभर पोचविण्याचा श्रीया यांचा मानस आहे. 

ऑनलाइनचे महत्त्व वाढले 
जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या संसर्गानंतर भारतातही घरपोच भाज्या आणि फळांची ग्रहाकांची मागणी वाढली. ‘झामा’द्वारे या सर्व गोष्टी बटणाच्या एका क्लिकवर ग्राहकांना घरपोच उपलब्ध होत आहेत. ‘झामा’ थेट शेतकऱ्यांसोबत काम करत असल्यामुळे देशभरातील विविध भागांतील शेतीतून थेट येणाऱ्या भाज्या, फळे आणि मसाले ग्राहकांना त्यांच्या दारात मिळत आहेत. महाराष्ट्र व उत्तराखंडातील महिला बचत गट व आदिवासी महिलांची या सर्व कामांसाठी मदत घेतली जाते. 

(शब्दंकन - ऋतुजा कदम) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com