सहाय्यक शिक्षण संचालक गोविंद करणार शिक्षणाचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

फुले विद्यालयातील विद्यार्थिनीला घेतले दत्तक

सिडको - पखाल रोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील साक्षी खंडारे हिला शिक्षण संचालक दिलीप गोविंद यांनी दत्तक घेतले असून, तिचा शालेय खर्च ते करीत आहेत. तिला श्री. गोविंद यांच्या हस्ते शालेय साहित्य देण्यात आले. महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बी. के. बच्छाव, सरचिटणीस पुरुषोत्तम फुलसुंदर, बांधकाम व्यावसायिक गांगुर्डे, श्री. आव्हाड, प्राचार्य मधुकर बच्छाव, मुख्याध्यापक सुनील शेवाळे आदी उपस्थित होते.

श्री. गोविंद म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी जीवनात चांगले काही करायचे असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मुलींनी सावित्रीबाईंच्या कार्याचा आदर्श घ्यावा.’’ वसंत अहिरे यांनी सूत्रसंचालन केले.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले विद्यालयात श्री. गोविंद पारितोषिक वितरणास आले होते. त्या वेळी सहावीत शिकणाऱ्या साक्षी खंडारेला विविध स्पर्धा व गुणवत्तेची अनेक पारितोषिके मिळालेली पाहून त्यांनी साक्षीला आर्थिक मदत करण्याचे ठरविले. सुरवातीला शालेय साहित्य दिल्यानंतर ही मुलगी निश्‍चितच काहीतरी वेगळे करू शकते, याची जाणीव झाल्याने तिचा पूर्ण शिक्षणाचा खर्च श्री. गोविंद यांनी करण्याचा निर्णय घेतला. 

साक्षी अतिशय मेहनती आणि गरीब कुटुंबातील मुलगी आहे. तिला विविध खेळ, स्पर्धांमध्ये भाग घ्यायला आवडते. त्यात आता शिक्षणाचा आर्थिक भार श्री. गोविंद यांनी उचलला आहे. त्यातून तिला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळणार आहे. ती आमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे, याचा आनंद मोठा आहे.
- मधुकर बच्छाव, प्राचार्य

दोन वर्षांपासून शालेय साहित्यासह गणवेश मिळत असल्याने मला पुन्हा काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली आहे. शिकून खूप मोठे होण्याचे माझे स्वप्न आहे. 
- साक्षी खंडारे, विद्यार्थिनी

Web Title: sidko news dilip govind education expenditure on sirl student adopt