एसटी प्रवाशांना "अलर्ट' करणारा वाहक 

msrtc
msrtc

कोल्हापूर - अचानक कुठल्यातरी गावाला जायचे झाल्यास ऐनवेळी किती वाजता एसटी आहे याची योग्य माहिती जवळ नसते, बस स्थानकावरील फोन नंबर मिळत नाहीत, मिळाला तरी त्वरित फोन लागेल तो उचलला जाईल याची खात्री नाही... अशा स्थितीतील वयोवृद्ध प्रवाशांपासून ते विद्यार्थी-नोकरदार अशा सर्वस्तरातील प्रवाशांना केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर राज्यभरातील एसटीचे वेळापत्रक सांगणारे वाहक उत्तम पाटील प्रवाशांचे मित्र बनून गेले आहेत. कोल्हापूर मध्यवर्ती आगारात प्रवासी सेवेसाठी श्री. पाटील यांनी स्वतः हून राबविलेले विविध उपक्रम प्रवासाचा ताण हलका करण्यास उपयुक्त ठरत आहेत. 

कोल्हापूर आगारातर्फे 4 वर्षांपूर्वी कोल्हापूर-गणपतीपुळे गाडी सुरू झाली. गाडीला जेमतेम प्रतिसाद होता. याच मार्गावर श्री. पाटील यांना ड्यूटी असायची. थोड्या दिवसात या मार्गावरील नियमितपणे प्रवाशांचा त्यांना अंदाज आला. त्यांनी प्रवाशांशी मैत्री करीत या मार्गावरील अन्य प्रवाशांची माहिती घेतली. चर्चेतून अनेक प्रवासी एसटीची वेळ माहिती नसल्याने खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळतात हे लक्षात आले. तेव्हा श्री. पाटील यांनी अशा सर्व प्रवाशांचे मोबाइल क्रमांक संकलित केले. गाडी सुटण्यापूर्वी अर्धा तास किंवा गाडी निघाल्यानंतर वाटेतील गावातील बस स्थानकावर पोचण्याआधी वीस मिनिटे श्री. पाटील मार्गातील प्रवाशांना मिस कॉल किंवा मोबाइलवर संपर्क साधतात. त्यामुळे नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या फोन कॉलचा आधार वेळ वाचविणारा ठरला आहे. त्यामुळे गाडीतील प्रवासी संख्या वाढून एसटीच्या महसुलातही भर पडली. हाच प्रकार त्यांनी कोल्हापूर-हिंजवडी या गाडीसाठीही वापरला. पुण्यातील आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अनेकजण कोल्हापुरातून दर शनिवारी-रविवारी कोल्हापूर-पुणे असा प्रवास करतात. त्यांचा व्हॉटस्‌ ऍप ग्रुप आहे त्यावरही श्री. पाटील गाडी वेळेत या प्रवाशाना कळवतात. 

ऍपचा वापर... 
श्री. पाटील यांनी एसटीचे आरक्षण ऍप मोबाईलवर डाऊनलोड केले आहे. राज्यात कोठेही प्रवास करायचा असो, कोणत्या बस स्थानकावरून कोणत्या गावाला जाणारी गाडी किती वाजता सुटते, किती वाजता येते याची नेमकी माहिती ऍपद्वारे मिळते. त्याचाही फायदा श्री. पाटील पुरेपुर करून घेतात. त्यातून प्रवाशांनाही होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com