आगाशिवकरांकडून ‘स्टोक कांगरी’ सर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

दोन युवकांची मोहीम फत्ते; कडेगावच्या मित्राचाही मोहिमेत सहभाग
मलकापूर - आगाशिवनगर व कडेगाव येथील तीन गिर्यारोहकांनी ‘स्टोक कांगरी’ हे हिमशिखर १४ तासांत यशस्वीपणे सर केले. २० हजार ८० फूट उंच खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर त्यांनी तिरंगा फडकावला. चौदापैकी चारच गिर्यारोहकांनी ही मोहीम यशस्वी केली. त्यात या तिघांचा समावेश होता.

कुणाल घराळ, अभिषेक पाटील (दोघेही रा. आगाशिवनगर) व शिवप्रसाद सगरे (कडेगाव) अशी या धाडसी गिर्यारोहकांची नावे आहेत. कुणाल, अभिषेक यांनी आगाशिव डोंगरावर गिर्यारोहण करण्याचा सराव केला. कसलेही इतर मार्गदर्शन नसताना गेल्यावर्षी प्राथमिक स्वरूपात सहज फिरण्यासाठी गेल्यावर हिमालयात १६ हजार फुटांपर्यंत यशस्वीपणे ट्रेकिंग केले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ‘स्टोक कांगरी’ हे हिमशिखर सर करण्याचे त्यांनी ठरवले.

लेह येथील बेस कॅम्प येथे जाण्यासाठी ३० जूनची तारीख निश्‍चित केली. तिघांसह बंगळूरहून दोन, दिल्लीहून दोन, डेन्मार्कचे दोन तसेच दोन ट्रेक लीडर व स्थानिक गाइड असे ग्रुप बेसकॅम्पला एकत्र आले. एक जुलैला मोहिमेला सुरवात झाली. ११ पैकी या तिघांसह नेव्हीत नोकरीस असलेला एक अशा चौघांनी सहा जुलैला सकाळी सात वाजता ‘स्टोक कांगरी’ शिखर सर केले. या साहसी वीरांनी देशाचा तिरंगा व महाराष्ट्राचा भगवा झेंडा शिखरावर फडकवला. कमी ऑक्‍सिजनमुळे केवळ दहा मिनिटेच तेथे थांबून चौघांनी परतीचा प्रवास सुरू केला.

‘स्टोक कांगरी’ पर्वत गिर्यारोहकांसाठी अत्यंत आव्हात्मक मानला जातो. खडकाळ प्रदेश व चढणीमुळे पहिल्याच दिवसापासून कस लागतो. पुढे अति उंचीमुळे ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे ही मोहीम अवघड आहे. जेवढे चढताना अवघड आहे, तेवढेच उतरतानाही अवघड आहे. 
- कुणाल घराळ, गिर्यारोहक, आगाशिवनगर

Web Title: stock kangari mountaineer