विद्यार्थ्यांनी बनवली विजेवर चालणारी सायकल

विद्यार्थ्यांनी बनवली विजेवर चालणारी सायकल

वाशी - नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी सुपरफास्ट इलेक्‍ट्रिक सायकल बनवली आहे. नेरूळमधील शिक्षण प्रसारक विद्यालयातील सातवीच्या तीन विद्यार्थ्यांनी हा प्रयोग यशस्वी केला आहे. २४ व्हॉल्टची मोटार आणि १२ व्हॉल्टच्या दोन बॅटरी जोडलेली ही सायकल विज्ञान प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र बनली आहे. 

नेरूळ सेक्‍टर- १२ मधील विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात प्रणव दारकुंडे, जय पडवळ आणि सुदर्शन घोडके या विद्यार्थ्यांनी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्‍ट्रिक सायकलचा प्रोजेक्‍ट सादर केला.  ही सायकल बनवण्यासाठी त्यांनी घरात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आरओमधील मोटरीचा वापर केला आहे. या मोटरीला मोटरसायकलमध्ये वापरल्या जाणाऱ्या १२ व्हॉल्टच्या दोन बॅटरी जोडल्या आहेत. सायकलच्या मागील चाकाला दोन फेरवेल बसवण्यात आले आहेत. त्यामुळे ही सायकल बॅटरीवरही चालते आणि चार्जिंग संपल्यानंतर पॅण्डलवरही चालवता येते. त्यांचा हा प्रकल्प कौतुकाचा विषय ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com