सुश्‍मिताच्या परिस्थितीला जिद्दीच्या पंखाचे बळ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नागठाणे - सुश्‍मिता ही गुजराती दांपत्यांची कन्या. आई दुसरी शिकलेली, तर वडील तिसरी. गावोगावच्या आठवडा बाजारात दोघेही मसाल्याचे पदार्थ विकणारे. हातावरचे पोट असणारे. मात्र, जिद्दीच्या पंखाचे बळ असेल, तर परिस्थिती आड येत नाही, हे सुश्‍मिताने दाखवून दिले आहे. 

नागठाणे - सुश्‍मिता ही गुजराती दांपत्यांची कन्या. आई दुसरी शिकलेली, तर वडील तिसरी. गावोगावच्या आठवडा बाजारात दोघेही मसाल्याचे पदार्थ विकणारे. हातावरचे पोट असणारे. मात्र, जिद्दीच्या पंखाचे बळ असेल, तर परिस्थिती आड येत नाही, हे सुश्‍मिताने दाखवून दिले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

सुश्‍मिता राजेश सर्वय्या या मुलीने मुंबईत आयोजित "बहुरंगी बहर' या हरहुन्नरी मुलांच्या शोध प्रकल्पात राज्यातील 800 मुलांमधून विजेतेपद पटकाविले. ती अतीत (ता. सातारा) येथील रणजित कौर गडोख खालसा महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थिनी. आठवी इयत्तेत शिकते. अर्थात प्राथमिक शाळेत शिकत असतानाच शिक्षकांनी तिच्यातील प्रतिभेला पैलू पाडले. घरची परिस्थिती तिच्या शिकण्याआड येणार नाही, याची काळजी घेतली. सुश्‍मिताचे आई- वडील हे अल्पशिक्षित. गावोगावी भरणाऱ्या आठवडा बाजारात ते मसाल्याचे पदार्थ विकण्याचा व्यवसाय करतात. रोज सकाळी घराबाहेर पडायचे. रात्री उशिरा घरी परतायचे. अशा परिस्थितीत अगदी लहान वयात सगळी जबाबदारी सुश्‍मितावर येऊन ठेपली. मात्र, त्यातूनही ती पुढे जात राहिली. मुख्याध्यापिका सुनीता शेडगे, राजश्री जाधव, संदीप मोहिते या शिक्षकांनी तिला कायम प्रोत्साहन दिले. दिव्या जगदाळे या मैत्रिणीने तिचा अभ्यास घेतला. 

त्यातून शोध प्रकल्पाची लेखी परीक्षा, गटचर्चा, मुलाखत यात ती यशस्वी ठरली. मग तिची निवड ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित अंतिम फेरीसाठी झाली. डॉ. आनंद नाडकर्णी, राजीव तांबे, शुभदा चौकर यांच्यासारख्या दिग्गज परीक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना तिने हजरजबाबीपणे उत्तरे दिली. त्यातून राज्यभरातील 800 विद्यार्थ्यांतून सुश्‍मिता विजेती ठरली. 

शिक्षकांचे अनोखे ममत्व 
राजश्री जाधव या शिक्षिका सुश्‍मिताला रोज स्वतः घरून जेवणाचा डबा घेऊन येत. इतकेच नव्हे, तर आपल्या घरचे वर्तमानपत्र रोज संध्याकाळी तिला वाचायला देत. संदीप मोहिते यांनी तर जणू तिचे पालकत्व स्वीकारले. तिच्या अभ्यासाची, मुंबईला घेऊन जायची जबाबदारी पार पाडली. शाळेतील अन्य शिक्षकांनीही तिला सहकार्य केले.

Web Title: success stories sushmita has won the title of child research project in state