चहाविक्रेते देताहेत ऊर्जाबचतीचा संदेश 

निशा वाबळे - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नाशिक - ऊर्जेचे कमी होत असलेले स्रोत व त्यास तयार होण्यासाठी लागणारा कालावधी, नजीकच्या काळात हे स्रोत संपुष्टात येणार आहेत, याची सर्वांनाच काळजी आहे. यामुळेच ऊर्जा संवर्धनाची जाणीव प्रत्येकालाच झाली आहे. 

नाशिक - ऊर्जेचे कमी होत असलेले स्रोत व त्यास तयार होण्यासाठी लागणारा कालावधी, नजीकच्या काळात हे स्रोत संपुष्टात येणार आहेत, याची सर्वांनाच काळजी आहे. यामुळेच ऊर्जा संवर्धनाची जाणीव प्रत्येकालाच झाली आहे. 

ऊर्जेचे संवर्धन व्हावे, यासाठी अनेक जण संदेश देतात. मात्र, त्यावर अंमलबजावणी करणारे त्या तुलनेत खूप कमी असतात. पर्यावरणरक्षणासाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न सुरू झाले आहेत. ऊर्जाबचत व सौरऊर्जेचे महत्त्व पटलेल्या नागरिकांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करायला सुरवात केली आहे. शेतकऱ्यांचाही यात समावेश होता. आता पहिल्यांदा एका चहा विक्रेत्याने सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणाचा वापर करून आपला व्यवसाय सुरू केला आहे. अमोल मगर आणि आशा मगर गेल्या महिन्यापासून गंगापूर रोड परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय करताहेत. ते चहा बनविण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या शेगडीचा वापर करतात. यात कोळसा टाकल्यानंतर त्याचा वापर सोपा होतो. त्यांच्या या सौरऊर्जेच्या उपकरणाच्या मदतीने जवळच असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यालाही त्याची सौरऊर्जेवर चालणारी गाडी सुरू करण्यास मदत झाल्याची माहिती अमोल मगर यांनी दिली. केवळ पाचवी शिक्षण झालेल्या अमोल मगर यांना सौरऊर्जेचे महत्त्व चांगले माहीत आहे. त्यामुळे इतरांनाही सौरऊर्जा वापरासाठी ते प्रेरित करताहेत. अमोल यांना प्रथम न्यू एज ऊर्जा विकास संस्थेतर्फे हे उपकरण देण्यात आले. त्याचे महत्त्व पटल्याने त्यांनीही या स्रोताचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्याचा वापर केल्यानंतर त्यांना ऊर्जाबचतीचे महत्त्व पटले. त्यामुळे त्यांनी सौरऊर्जेला प्राधान्य दिले. 

Web Title: Tea sellers giving energy savings message