शिक्षकाने महिलांना दाखविली 'मिश्री'मुक्तीची वाट

The teacher showed women the path of Relief From Bad Habit
The teacher showed women the path of Relief From Bad Habit

नागठाणे : शिक्षक म्हणजे गावच्या विकासाचा वाटाड्या हे समीकरण आजही खेडोपाडी रूढ आहे. त्याचीच प्रचिती देताना दुर्गम भागात कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने गावातील वीस महिलांना 'मिश्री'मुक्तीची वाट दाखविली. इतकेच नव्हे, तर त्याने या महिलांचा स्वखर्चाने साडी- चोळी देऊन सत्कार केला.

मोगरवाडी (ता. पाटण) हे डोंगरउंचावरील छोटेसे गाव. आजही गावापर्यंत पोहचणारी पक्की वाट अस्तित्वात नाही. अशा स्थितीत दीपक मगर या ध्येयवेड्या शिक्षकाची नुकतीच येथील शाळेत बदली झाली. मगर हे जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांनी शाळेसह गावाचा कायापालट करण्याचा जणू विडाच उचलला. गावातील बहुसंख्य महिला 'मिश्री'च्या आहारी गेल्या असल्याचे चित्र त्यांना जाणवले. याबाबत त्यांनी ग्रामस्थांचे, महिलांचे प्रबोधन करण्याचे ठरविले. शासन तसेच मुंबईतील सलाम फाउंडेशनतर्फे सध्या 'तंबाखूमुक्त शाळा' हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यापुढे जात मगर यांनी 'मिश्रीमुक्त कुटुंब' ही संकल्पना मांडली.

तंबाखू, मिश्रीचे दुष्परिणाम स्पष्ट केले. त्याला गावातून मोठा प्रतिसाद लाभला. त्यातून वीस कुटंबातील महिलांनी 'मिश्री' सोडण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला. या महिलांचा तारळे विभागाचे विस्तार अधिकारी सी. जी. मठपती यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मगर यांनी स्वखर्चाने या महिलांना साडी- चोळी देत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. यावेळी चव्हाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com