थाई बॉक्‍सिंगमध्ये गोंदियाचे खेळाडू चमकले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

गोंदिया - थाई बॉक्‍सिंग इंडिया फेडरेशनतर्फे आणि महाराष्ट्र थाई बॉक्‍सिंग असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत गोंदियाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. 23 ते 25 डिसेंबर 2016 दरम्यान पुणे-पिपरी येथे ही स्पर्धा पार पडली. 

यात राज्यभरातील 20 जिल्ह्यांतून जवळपास 500 खेळाडू सहभागी झाले होते. गोंदिया जिल्ह्याच्या चमूने उत्कृष्ट कामगिरी केली. रिशान अहमद, स्वप्नील मेश्राम, श्रावणी संपला, नियोजन चौरागडे, आर्यन रणदिवे, सोयांश अग्रवाल, आर्यन आंबेडारे, क्षितिज माने या खेळाडूंनी मेडल मिळवून गोंदिया जिल्ह्याचे नाव मोठे केले. पुण्यामध्ये आमदार गौतम चाबूकस्वार, महाराष्ट्र थाई बॉक्‍सिंग संघटनेचे अध्यक्ष मनयार, सचिव गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सर्व खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. जिल्हा संघाचे व्यवस्थापक राजू चौरागडे यांच्यासह प्रशिक्षक मालती लिल्हारे, हरिहर पटेल, सुभाष गांगरेड्डीवार, दामोदर अग्रवाल, डॉ. नवीन शाह, अशोक अग्रवाल, डॉ. राजेंद्र जैन, हुकूमचंद अग्रवाल आदींनी खेळाडूंचे कौतुक केले. हे सर्व खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले. फेब्रुवारीत खंडवा येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत ते खेळणार आहेत. 

Web Title: Thai boxing round player in Gondia