टोमॅटो उत्पादकांना  ‘वरुण’चा दिलासा

संदीप मोगल - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

लखमापूर - सध्या टोमॅटो भावाने नीचांकी दर गाठला आहे. मात्र, येथील वरुण ॲग्रो हेच टोमॅटो ३०० रुपये कॅरेटने खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. 

लखमापूर - सध्या टोमॅटो भावाने नीचांकी दर गाठला आहे. मात्र, येथील वरुण ॲग्रो हेच टोमॅटो ३०० रुपये कॅरेटने खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. 

सध्या सर्वच बाजार समित्यांत एक रुपया किलो दराने निर्यातक्षम टोमॅटोची खरेदी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाला जनावरांचे खाद्य बनविले आहे. जिल्ह्यात द्राक्षेबागेनंतर सर्वाधिक नगदी पीक म्हणून शेतकरी टोमॅटो पिकाला महत्त्व देत आहेत. मात्र, नोटाबंदीमुळे परराज्यांतून व परदेशातून येणारा पैसा बंदच झाला आहे. त्यातच एका अडतीत रोज लाखोंची खरेदी होत असतानाही बॅंक अडतदारांनाही काही हजारातच पैसे देतात. यामुळे अडतदार व शेतकऱ्यांत रोजच वाद होतात. यात काही अडतदार तर चक्क पुढील वर्षाचे धनादेश देत आहेत. काही ‘आरटीजीएस’च्या नावाखाली केवळ वेळ मारून नेतात. एकीकडे बाजारभाव पडले असतानाही विकलेल्या मालाचा पैसा काही अडतदार देत नसल्याने आता हे पीकच शेतात नको, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. 

सध्या टोमॅटोची मागणी घटल्याने केवळ ज्यूस बनविणाऱ्या कंपन्यांसाठी व्यापारी खरेदी करीत आहेत. सध्या दिंडोरी तालुक्‍यातील ‘वरुण ॲग्रो’कडून रोज ३० हजार कॅरेट दराने टोमॅटोची खरेदी केली जात असल्याने बुडत्याला काडीचा आधार मिळाला आहे. यातच जे शेतकरी थेट कंपनीला लाल माल पुरवतात, त्यांच्यासाठी बाजारपेठेपेक्षा चांगला भाव मिळत आहे. कंपनी पडलेल्या बाजारभावातही ठरलेली रक्कमच शेतकऱ्यांना देत आहे. पूर्वीची ३५० टनांची क्षमता आता ७०० वर नेण्यात आल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचतो. कंपनी अजून दीड महिना माल खरेदी करणार असल्याचे वरुण ॲग्रो फ्रूड प्रोसेसिंगच्या संचालिका मनीषा धात्रक यांनी सांगितले.

Web Title: three hundred rupees per kg caret