दानशुरांमुळे महिलेवर उपचार

दानशुरांमुळे महिलेवर उपचार

निरगुडसर - उपचाराअभावी सहा महिन्यांपासून अंथरुणात पडलेल्या निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील सुमन बबन वाघ (वय ६५) या महिलेला उपचारांसाठी ग्रामस्थांची लोकवर्गणीतून मदत केली. त्यामुळे ही महिला आता स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे.

निरगुडसर येथील सुमन बबन वाघ यांच्या खुब्यात फॅक्‍चर होऊन त्या अंथरुणात पडून होत्या. त्यांना स्वत:ची कामेही करता येत नव्हती. त्यांना प्रत्येक दिवशी मोठ्या कसोटीला सामोरे जाव लागत होते. या प्रकाराची माहिती निरगुडसर  गावातील माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील यांना कळल्यानंतर त्यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर संबंधित महिलेचे पती बबन वाघ यांच्यासमवेत माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली. त्यानुसार वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री निधीतून ७५ हजार व सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून २५ हजार असा एकूण १ लाख रुपयांचा निधी मिळवून दिला. उर्वरित कमी पडलेली ५६ हजार रुपयांची रक्कम रामदास वळसे पाटील यांनी स्वत:कडील २२ हजार रुपये व बाकी गावातून उभी करून भोसरी येथील साईनाथ हॉस्पिटलमध्ये उपचार केले. या वेळी डॉ. सुहास कांबळे यांनी मोठे सहकार्य केले.

बाळासाहेब येवले, प्रकाश कटारिया, सुरेश टाव्हरे, संदीप वळसे पाटील, हनुमंत टाव्हरे, अनिल टाव्हरे, चंद्रकांत वळसे पाटील, नारायण गोरे, सुनील वळसे, गोरक्षनाथ टाव्हरे, नीलेश टाव्हरे, सचिन वाळुंज, दिलीप वळसे पाटील, अनिल वळसे पाटील, नवनाथ टाव्हरे, डॉ. अतुल साबळे, जनार्दन मिंडे, मिलिंद वळसे पाटील, कैलास सुडके, बाळशिराम टाव्हरे, बाबा टाव्हरे, दिगंबर सुडके, जालिंदर टाव्हरे यांच्यासह निरगुडसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयातील संतोष टाव्हरे यांच्या दहावीतील बॅचच्या ग्रुपने लोकवर्गणीतून पैशाची उभारणी करून त्या महिलेवर उपचार करण्यात आले.

भोसरी येथील रूग्णालयात १५ दिवस उपचारांसाठी होते. माझ्या कपड्यांसह जेवणाची व्यवस्था चंदा रामदास वळसेपाटील यांनी केली. दिवसातून तीन-तीन वेळा हॉस्पिटलमध्ये येऊन माझी काळजी घेतली. त्या वेळी माझ्याबरोबर कुटुंबातील काळजी घेण्यास कोणी नव्हते. एक प्रकारे ती माझ्यासाठी माउलीसारखीच धावून आली.
- सुमन वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com