esakal | भारीच! उंडाळे पंचायत रुग्णांना देणार मोफत 'ऑक्‍सिजन'

बोलून बातमी शोधा

भारीच! उंडाळे पंचायत रुग्णांना देणार मोफत 'ऑक्‍सिजन'}

कठीण काळात गावातील रुग्णांना ऑक्‍सिजन तरी मिळावा, यासाठी ग्रामपंचायतीने ऑक्‍सिजन किट खरेदी केलेले आहे. त्याबरोबर गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना मास्क, टेंपरेचर गन, ऑक्‍सिमीटर आदी साहित्य देऊन गावात सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे.

kahi-sukhad
भारीच! उंडाळे पंचायत रुग्णांना देणार मोफत 'ऑक्‍सिजन'
sakal_logo
By
जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) :  ग्रामपंचायतीने अडचणीतील रुग्णांना हॉस्पिटल्समधून ऑक्‍सिजनची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ऑक्‍सिजनची व्यवस्था व्हावी म्हणून ऑक्‍सिजन किट खरेदी केले असून, ग्रामस्थांना ते मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

दिवसेंदिवस गावोगावी कोरोना विषाणूचे संक्रमण वाढते आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याला दवाखान्यामध्ये बेड मिळता मिळत नाही. अत्यावश्‍यक रुग्णांना ऑक्‍सिजन मिळणे दुरापास्त झालेले आहे. अशा कठीण काळात गावातील रुग्णांना ऑक्‍सिजन तरी मिळावा, यासाठी ग्रामपंचायतीने ऑक्‍सिजन किट खरेदी केलेले आहे. त्याबरोबर गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना मास्क, टेंपरेचर गन, ऑक्‍सिमीटर आदी साहित्य देऊन गावात सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे.

गिधाडांच्या वास्तव्याच्या नोंदी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ठेवणार 
 
या वेळी सरपंच दादासाहेब पाटील म्हणाले, कोरोना महामारीच्या काळामध्ये रुग्णालयात सध्या बेड उपलब्ध होत नाहीत. किमान गावातील रुग्णांना गावामध्ये ऑक्‍सिजन उपलब्धता व्हावी, या उद्देशाने ऑक्‍सिजन किट खरेदी केले आहे. गरजवंतांना याचा उपयोग निश्‍चित होईल. त्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीने गावासाठी हे पोर्टेबल ऑक्‍सिजन किट खरेदी केले आहे. गरजूंनी ग्रामपंचायत अथवा कोरोना समितीकडे संपर्क करावा, असे त्यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे