वैष्णवी मांडेकरची लिम्कामध्ये नोंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

हिंजवडी - जागतिक महिला दिनानिमित्त मागील वर्षी मुळशी तालुक्‍यातील चांदे गावची सुकन्या आणि राष्ट्रीय कराटेपट्टू वैष्णवी मांडेकर हिने केलेल्या विश्‍वविक्रमाची लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. वैष्णवी हिने खिळ्यांच्या फळीवर झोपून पाच मिनिटे २४ सेकंदांत एक टन वजनाच्या फरश्‍या फोडण्याचा विक्रम केला होता.  

वैष्णवीने तिची पुण्यातील मैत्रीण अस्मिता जोशी हिच्यासमवेत हा विक्रम प्रस्थापित केला होता. लिम्का बुक ऑफ रेकार्डने त्या विक्रमाबद्दलचे पाठविलेले प्रमाणपत्र तिला नुकतेच मिळाले. क्रीडा प्रशिक्षक विक्रम मराठे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. आतापर्यंत तिने मातोल कराटे क्रीडा प्रकारातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नावलौकिक कमावला आहे. ती सध्या पुण्यातील मॉर्डन महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. 

बालेवाडी येथे झालेल्या नॅशनल रूरल चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले. या यशाबद्दल, आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य राजेंद्र झुंजारराव, क्रीडा शिक्षक विक्रम फाले यांनीही तिचे विशेष कौतुक केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaishnavi mandekar Register in limca book