भाजी विकणाऱ्या युवतीची फिनिक्‍स भरारी

कऱ्हाड - कऱ्हाडच्या भाजी मंडईत भाजी विकताना अनु कांबळे. तिने न्यायालयीन लिपिक परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
कऱ्हाड - कऱ्हाडच्या भाजी मंडईत भाजी विकताना अनु कांबळे. तिने न्यायालयीन लिपिक परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

प्रतिकूलतेवर मात करत कऱ्हाडची अनु झाली न्यायालयीन परीक्षेत उत्तीर्ण 
कऱ्हाड - रविवार म्हणजे कऱ्हाडचा बाजार... आजही ती बाजारात भाजी विकत होती... वयाच्या दहाव्या वर्षापासून भाजी विकणाऱ्या अनुने कष्ट करत आज मोठे यश मिळवले. नुकत्याच झालेल्या न्यायालयीन भरती परीक्षेत तिची येथील न्यायालयात निवड झाली. अनु दिलीप कांबळे असे न्यायालयाच्या भरती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या भाजी विकणाऱ्या युवतीचे नाव आहे. ती जिल्ह्यातून आठ हजार विद्यार्थ्यांतून निवडली गेली आहे. 

अनुचे येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. वेणूताई चव्हाण महाविद्यालयात तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पाचवीत असल्यापासून शिकतानाच ती नेहमी आईसोबत बाजारात भाजी विकायलाही यायची. रविवार शाळेला सुटी होती. मात्र, बाजाराचा दिवस असल्याने दिवसभर आईसोबत व कळते वय झाल्यावर आईबरोबर दुसऱ्या बाजूला ती स्वतंत्र भाजी विकत बसायची. त्यातूनही अभ्यासाला वेळ काढायची. ठरल्या वेळेत अभ्यास व काम अशी सांगड घालताना अनुने लहानपणापासूनच ‘कमवा आणि शिका’ तिच्या अंगवळणी पडले होते. त्याचे फलित आज तिला मिळालेल्या यशाच्या रूपाने पुढे आले आहे. 

पदवीचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, ती कशी द्यायची असते, याचे कुतूहल अनु तिच्या शिक्षकांना विचारायची. त्यातून काही तज्ज्ञांशीही ती बोलायची. तिने राज्य लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्‍शन, केंद्रीय लोकसेवा आयोग अशा वेगवेगळ्या परीक्षा दिल्या. मात्र, त्यातून ती कधी खचली नाही. काही काळ प्रांत कार्यालयातही ती शिकाऊ म्हणून काम करत होती. काही महिन्यांपूर्वी न्यायालयीन लिपिकपदाची भरतीप्रक्रिया झाली. ती परीक्षा तिने दिली. त्यासाठी सातारा जिल्ह्यातून आठ हजार विद्यार्थी बसले होते. त्यात तिची निवड झाली. स्पर्धा परीक्षेप्रमाणे त्यांच्या निवडी व्हायच्या. पहिल्या १७१ जणांच्या यादीत अनुची निवड झाली. तिला येथील न्यायालयातच नियुक्ती मिळाली आहे. ती लवकरच नोकरीत हजर होते आहे. तिच्या यशाबद्दल मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, दादा शिंगण यांनी तिचा सत्कारही केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com