दिव्यांग दांपत्यांचा जिद्दीचा जीवनप्रवास

वालसावंगी - दोन्ही पायाने दिव्यांग असताना देखील कापड दुकानात मजुरी करताना देवराव आहेर. (दुसऱ्या छायाचित्रात) देवराव आहेर कुटुंबीयांसह.
वालसावंगी - दोन्ही पायाने दिव्यांग असताना देखील कापड दुकानात मजुरी करताना देवराव आहेर. (दुसऱ्या छायाचित्रात) देवराव आहेर कुटुंबीयांसह.

वालसावंगी - पाठीवरती हाथ ठेऊन फक्त लढ म्हणा... या ओळींची प्रचिती येथील दिव्यांग देवराव आहेर व त्यांची पत्नी लक्ष्मी यांचा जीवनाशी सुरू असलेल्या संघर्षातून पहावयास मिळते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करण्याची त्यांची तयारी व जिद्द एक आदर्शदायी आहे. 

दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही देवराव आहेर यांनी संघर्ष करण्याची जिद्द सोडली नाही. त्यांनी उदरनिर्वाह व्हावा म्हणून इतरांसारखे शिक्षण सुरू ठेवले. ते बीए द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. त्यांची पत्नी लक्ष्मी देखील एका हाताने व एका पायाने दिव्यांग आहे. मात्र, त्यांचीसुद्धा मोलाची साथ देवराव यांना मिळत आहे. देवराव आहेर याने उदरनिर्वाह व्हावा म्हणून पानटपरी टाकली. यातून शंभर-दोनशे रुपये दिवसभरात कमवून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला जात असे. पुढे पानटपरीतून आर्थिक लाभ होत नसल्याने ते आता कापड दुकानात काम करत आहेत.  

त्यांची पत्नी लक्ष्मी देखील दिव्यांग असूनसुद्धा केवळ कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून इतर महिलांच्या सोबत शेतात मजुरीला जात आहे. इतर महिलांप्रमाने जरी त्या काम करू शकत नसल्या तरी दिव्यांग असूनही त्यांचा कामाचा वेग थक्क करणारा आहे. आहेर दांपत्याला एक मुलगी असून ती पाचवीत शिक्षण घेत आहे.

बॅंकेकडून उपेक्षा
देवराव आहेर यांना अपंग बीज भांडवल कर्ज दीड वर्षांपासून मंजूर झाले आहे, मात्र येथील बॅंकेकडून अद्यापही त्यांना कर्ज मिळाले नाही, ते दीड वर्षांपासून बॅंकेच्या पायऱ्या झिजवत आहेत, मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. परिणामी कापड दुकानात काम करावे लागत आहे.

दिव्यांग असल्याचा कधी पश्‍चाताप होत नाही. उलट यामुळे संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. जीवनात संघर्ष करताना आनंद होतो आहे. पत्नीची साथ मिळत असल्याने जीवन आनंदी वाटते आहे. कुणाकडून कधीच आर्थिक मदतीची अपेक्षा केली नाही, उलट जीवनात संघर्ष करण्याची शक्ती मागितली.
- देवराव आहेर, ग्रामस्थ, वालसावंगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com