लाकडी पट्ट्यांनी तोलले 87 किलो वजन! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

खर्डी - लाकडी पट्ट्यांना आकार देऊन त्यावर थोडेथोडके नाही तर, तब्बल 87 किलोचे सिमेंट ब्लॉकचे वजन पेलण्याचा प्रयोग आसनगावच्या सोनल रवींद्र पाटील हिने नाशिकला झालेल्या ई-टॅब स्पर्धेत सादर केला. 150 विद्यार्थी सहभागी झालेल्या या स्पर्धेत सोनलचा हा प्रयोग अव्वल ठरला. 

नाशिक येथील कॉलेजमधील सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या सोनलला सतत नवीन गोष्टी करण्याची आवड आहे. त्यामुळेच नाशिक येथे संदीप फाऊंडेशनतर्फे "ई टॅब' स्पर्धेत ती सहभागी झाली. या स्पर्धेत एक तासाच्या अवधीत 20 बाय 10 सेंटिमीटर लाकडी पट्ट्यांच्या साह्याने बिल्डिंगचे मॉडेल बनवायचे होते. यासाठी सोनलने लाकडी पट्ट्या, कटर व फेविक्विकच्या मदतीने हलक्‍या वजनाच्या लाकडी पट्ट्यांचा वापर करून बिल्डिंगचे मॉडेल तयार केले. या लाकडी मनोऱ्याचे वजन 100 ग्रॅम इतके होते. त्यावर तिने प्रत्येकी 7 ते 9 किलो वजनाचे सिमेंट ब्लॉंकचे थर लावले. या सर्वांचे एकूण वजन 87 किलो होते. इतके वजन ठेवूनही हा लाकडी मनोरा कणभरही वाकला नाही. हा प्रयोग पाहून परीक्षकही आवाक झाले आणि त्यांनी सोनलचे कौतुक केले.

Web Title: Wooden bars balance 87 kg of weight