चिठ्ठी सोडतीने ठरतो गणेशमूर्तीदाता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

राजापूर - देणगी स्वरूपामध्ये सर्व गणेशभक्तांना गणेशमूर्ती देण्याची संधी मिळावी म्हणून राजापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे चिठ्ठी सोडत पद्धतीने भाग्यवान गणेशमूर्तीदाता ठरविला जातो. परंपरा, धार्मिकतता आणि सामाजिक सलोखा साधत गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या या मंडळातर्फे गणेशमूर्ती दाता निश्‍चितीकरणाची ही पद्धत कधीपासून आहे, याबाबत निश्‍चित माहिती नाही. ही परंपरा सुमारे पन्नास वर्षाहून अधिक काळ सुरू असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिकांनी दिली. 

या सोडतीमध्ये राजापूर तालुकाच नव्हे, तर पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातील गणेशभक्तांना मूर्तीदाता बनण्याची संधी लाभली आहे. 1926 मध्ये राजापूरात काही वकील मंडळी आणि नागरिकांनी पुढाकार घेवून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यामध्ये वासुशेठ मालपेकर, डॉ. प्रभात कुळकर्णी, लेले मास्तर, बापूसाहेब अभ्यंकर, दादासाहेब पाध्ये, मोडक मास्तर, शामराव इंदूलकर, राजाभाऊ ताम्हणकर आदींसह अन्य काहींचा समावेश होता. गेली 91 वर्षे उत्सवाचे पावित्र्य, धार्मिकतता आणि परंपरा जपत संस्कृती संवर्धनाचा वसा मंडळाने जपला आहे. या मंडळाच्या ठिकाणी प्रतिष्ठापित होणारी गणेशमूर्ती दात्यांनी देणगी स्वरूपामध्ये दिलेली असते. विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे अनोख्या पद्धतीने मूर्तीदाता निश्‍चित केला जातो. 

गणेशोत्सवापूर्वी काही दिवस सार्वजनिक ठिकाणी पेटी ठेवून त्यामध्ये ज्या गणेशभक्तांना मूर्ती द्यायची इच्छा आहे, अशा दात्यांकडून आपल्या नावाची चिठ्ठी या पेटीत टाकली जाते. विसर्जना गणेशघाटावर पेटीमध्ये आलेल्या चिठ्ठ्यांमधून सोडत पद्धतीने मूर्तीदात्याची निवड केली जाते. या सोडतीसाठी पेटीमध्ये पन्नासहून अधिक इच्छुकांच्या चिठ्ठ्या असतात. 

केवळ एकच अट.. 
चिठ्ठीद्वारे निवडला जणाऱ्या मूर्तीदात्याला फारशा कोणत्याही अटी आणि शर्ती नसतात. मूर्तीदात्याने कुठल्याही मुर्तीकाराकडून तयार केलेली मूर्ती चालेल. मात्र ती पालखीमध्ये बसण्याएवढी उंचीची असणे गरजेचे असते. त्यातच ती मूर्ती पर्यावरणपूरक अशी मातीची असावी अशी सर्वसाधारण अटी मूर्तीदात्याला मंडळाकडून घातल्या जातात. मूर्तीदात्याची इच्छा असल्यास त्याच्या हस्ते मूर्तीची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना होते. गणेश विसर्जनादिवसशी मूर्तीदात्याला मंडळातर्फे प्रसाद देवून गौरव करण्यात येतो.

Web Title: ganesh festival 2017 rajapur ganesh ustav