मूर्ती आणण्यासाठी लगबग

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 August 2017

काऊंटडाऊन सुरू - पावसाचे विघ्न टाळण्याचे प्रयत्न
वेंगुर्ले - गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण पसरले असून सध्या सुरू झालेल्या पावसाचे विघ्न टाळून गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी भक्तांची लगबग वाढली आहे. गणेशभक्तांनी आपापल्या गणेशमूर्ती शाळेतून घरी नेण्यास सुरू केल्या आहेत.

घरोघरी चाकरमान्यांचे आगमन झाले आहे. बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. शोभेच्या फुलांचे हार, थर्माकोलची सजावट केलेली मखरे, विविध प्रकारचे फटाके आणि नवीन कपडे तसेच किराणा व मिठाई आदी दुकानांवर गणेशभक्तांची झुंबड उडाली आहे. दरवर्षी ५ ते ८ रुपयांपर्यंत मिळणारे नारळ या गणेशोत्सवात १५ ते ३० रुपयांपर्यंत ‘जीएसटी’ बसल्याने महागले आहेत. या वर्षीच्या बाजारात ‘जीएसटी’चे नाव सर्वच चाकरमानी घेत आहेत. वरील माल विक्रेते मात्र; ‘जीएसटी’सह वस्तू खरेदीच्या पावत्या देत नाहीत. याबाबत ग्राहकांमध्ये चर्चा आहे. चाकरमानी येथील स्थानिक हॉटेलमध्ये जाऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. काही गणेशमूर्ती शाळांमध्ये गणपती रंगवून पूर्णावस्थेत ठेवले आहेत. तर काही शाळांमध्ये गणपतीचे किरकोळ काम करताना मूर्तिकार मग्न असल्याचे चित्र आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vengurle konkan news ganeshotsav