‘तेरे मेरे सपने’ला घाणेकर चषक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

रत्नागिरी - अ. भा. मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखा व पालिका आयोजित कै. शंकर घाणेकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका चषक सांगलीतील श्री भगवती क्रिएशन्सच्या ‘तेरे मेरे सपने’ या एकांकिकेने पटकावला.

रत्नागिरी - अ. भा. मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखा व पालिका आयोजित कै. शंकर घाणेकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका चषक सांगलीतील श्री भगवती क्रिएशन्सच्या ‘तेरे मेरे सपने’ या एकांकिकेने पटकावला.

मुंबईतील नाट्यकीर्तीच्या इव्होल्यूशन अ क्वेश्‍चन मार्कने द्वितीय व इचकरंजीच्या अविरत कलामंचच्या ‘अफू’ने तिसरा क्रमांक मिळवला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालाच्या ‘म्याडम’ला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. स्वा. सावरकर नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण  झाले.

‘मानाचि’तर्फे लेखन कार्यशाळा
दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी ‘मानाचि’ संस्थेमार्फत रत्नागिरीत लेखकांची कार्यशाळा घेण्याचे आश्‍वासन दिले. टीव्ही मालिकांमुळे ‘सुपारीस्टार’ वाढत आहेत. मालिका जगण्यासाठी नक्कीच उपयोगी आहेत, मात्र नाटक, एकांकिकांमधून वर्षानुवर्षे टिकणारे कलाकार निर्माण होत असल्याचे सांगितले.

सविस्तर निकाल असा- पुरुष अभिनय- यशोधन गडकरी (तो, तेरे मेरे सपने), पराग फडके (घिस्सू, अफू), स्वप्नील धनावडे (नंदू, अर्थवार्म, रसिक रंगभूमी, रत्नागिरी), स्त्री अभिनय- कविता गडकरी (ती, तेरे मेरे सपने), स्नेहल महाडिक (सारा, सॉल्व्हड वन डिव्हायडेड बाय टू इज इक्वल, क्रिएटिव्ह कार्टी, मुंबई), सायली जोशी (कोराओ, इव्होल्यूशन अ क्वेश्‍चन मार्क), लक्ष्यवेधी भूमिका- आर्यन कासारे (बनी तो बनी, संस्कृती फाउंडेशन, लांजा). दिग्दर्शन- साबा राऊळ (इव्होल्यूशन अ क्वेश्‍चन मार्क), यशोधन गडकरी (तेरे मेरे), अनिरुद्ध दांडेकर (अफू), नेपथ्य- केतकी, अभिषेक (तेरे मेरे), अनिकेत विचारे (इव्होल्यूशन), राजेश, चेतन व विशाल (म्याडम), पार्श्‍वसंगीत- नादश्री व अभिमन्यू (तेरे मेरे), अक्षय व गौरव (म्याडम), कश्‍मिरा सावंत (अल्पविराम, कलारंग रत्नागिरी).

प्रकाशयोजना- सुप्रभात व निर्मला (तेरे मेरे), अनिरुद्ध दांडेकर (अफू), शुभम व अक्षय (म्याडम). लेखन- इरफान मुजावर (तेरे मेरे), प्राजक्त देशमुख (अफू). स्टार थिएटर्सतर्फे स्व. आनंद प्रभुदेसाई स्मृती विनोदी अभिनय- विशाल जाधव (मल्टिप्लस आम्ही कलाकार, भाईंदर). विजयकुमार नाईक, संजय बोरकर व आनंद म्हसवेकर यांनी परीक्षण केले.

या वेळी नगरसेविका राजेश्‍वरी शेट्ये, मीरा पिलणकर, दिशा साळवी, श्रद्धा हळदणकर, प्रशांत साळुंखे, महेश म्हाप, घनश्‍याम मगदूम, समीर इंदुलकर, आसावरी शेट्ये, प्रफुल्ल घाग, राजेंद्रकुमार घाग, राजकिरण दळी, सनातन रेडीज आदी उपस्थित होते.

Web Title: Ratnagiri News Ghanekar Award to Tere Mere Sapane