चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या ‘मानापमान’चा झेंडा

चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या ‘मानापमान’चा झेंडा

रत्नागिरी - कोल्हापूर येथे झालेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईच्या एमसीजीएम संगीत व कला अकादमीच्या ‘पंडितराज जगन्नाथ’ला प्रथम पारितोषिक मिळाले. 

रत्नागिरीच्या अखिल चित्तपावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाच्या ‘संगीत मानापमान’ नाटकास द्वितीय पारितोषिक आणि पाच वैयक्तिक पारितोषिके मिळाली. सांगलीच्या देवल स्मारक मंदिरच्या ‘संगीत कथा ही बिलासखानी तोडीची’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक मिळाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आज निकाल घोषित केला. कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात २ ते २८ फेब्रुवारीदरम्यान २० नाट्यप्रयोग झाले. आश्रय सेवा संस्थेच्या संगीत लावण्यसखी या नाटकासही वैयक्तिक पारितोषिके प्राप्त झाली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा ः  दिग्दर्शन- सुवर्णागौरी घैसास (पंडितराज जगन्नाथ), ॲड. अमित सावंत (मत्स्यगंधा), नेपथ्य- दादा लोगडे (लावण्यसखी), सुधीर ठाकूर (पंडितराज जगन्नाथ) नाट्यलेखन- विद्या काळे (फुलले प्रेम पाषाणी), अमेय धोपटकर (लावण्यसखी), संगीत दिग्दर्शन- प्रा. शरद बापट (कथा ही बिलासखानी तोडीची), श्रीनिवास जोशी (मानापमान) संगीतसाथ ऑर्गन- विलास हर्षे (मानापमान), विशारद गुरव (पंडितराज जगन्नाथ, परस्पर सहायक मंडळ वाघांबे, गुहागर), संगीतसाथ तबला- निखिल रानडे (मानापमान), दत्तराज शेट्ये (संशयकल्लोळ), संगीत व गायन रौप्यपदक : प्रवीण शिलकर (मानापमान), अभिषेक काळे (कथा ही बिलासखानी तोडीची), सिद्धी बोंद्रे (मानापमान), श्रद्धा जोशी (कथा ही बिलासखानी तोडीची), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक- दिगंबर परब (संशयकल्लोळ), भालचंद्र उसगावकर (ययाती आणि देवयानी), सोनिया शेट्ये (संशयकल्लोळ), निवेदिता चंद्रोजी (मत्स्यगंधा) गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे- सिद्धी पार्सेकर (योगी पावन मनाचा), संचिता जोशी (लावण्यसखी), स्मिता कदम (पंडितराज जगन्नाथ), श्रध्दा जोशी (एकच प्याला), मीनल कामत (संशयकल्लोळ), दशरथ नाईक (योगी पावन मनाचा), मिलिंद करमरकर (पंडितराज जगन्नाथ), केदार पावनगडकर (पंडितराज जगन्नाथ), दशरथ राऊत (सूर नाही संपलेले), विश्वनाथ दाशरथे (कथा ही बिलासखानी तोडीची), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे- सीमा बर्वे (मत्स्यगंधा), मेधा पार्सेकर (ययाती आणि देवयानी), गीताजी मातोंडकर (परब्रह्म आले भेटी), वैशाली आजगावकर (पंडितराज जगन्नाथ), श्रीयंका देसाई (सूर नाही संपलेले), चंद्रशेखर गवस (एकच प्याला), अविनाश पवार (पंडितराज जगन्नाथ), कबीर जगताप (पंडितराज जगन्नाथ), चिन्मय आपटे (शनिवारवाडा विकणे आहे), नितीन जोशी (लावण्यसखी).

या स्पर्धेसाठी विजय कुलकर्णी, दीपक कलढोणे आणि अनिरुद्ध खरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यंदा रत्नागिरीत स्पर्धा होणे अपेक्षित होते. मात्र, ती न झाल्याने नाट्यरसिकांनी एक दिवसाचे उपोषणही केले होते. त्यामुळे ही स्पर्धा बरेच दिवस गाजत होती.

संगीत नाटकांची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी व पुढे नेण्यासाठी, चित्पावन मंडळाने स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला. रत्नागिरी शहरामधून यंदा स्पर्धेत दुसरा कुठलाही संघ सहभाग घेत नव्हता. नाटकात नवीन कलाकारांना संधी दिली. दिग्दर्शक वामन ऊर्फ राजाभाऊ जोग यांनी मेहनत घेऊन कलाकार घडवले. यातील गायक व वादक कलाकारांनी तर कमालच केली. संगीत नाट्य परंपरा ही रत्नागिरीतील संघ समर्थपणे पुढे नेऊ शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. 
- श्रीनिवास जोशी,
सूत्रधार, संगीत मार्गदर्शक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com