सत्याचा शोध घेणारे कोर्ट मार्शल

सत्याचा शोध घेणारे कोर्ट मार्शल

सत्य माणसाला लपवता येत नाही आणि लपवण्याचा प्रयत्न केला तरी कणांकणांनी सामोरे येत असते. अखेर सत्याची आस धरणारेच यशस्वी होतात. अशाच सत्याचा शोध घेणारे मंदार काळे लिखित व अभिजित काटदरे दिग्दर्शित नाटक ‘कोर्ट-मार्शल’ राज्यनाट्य स्पर्धेत रसिकांना पाहायला मिळाले. (कै.) डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान, चिपळूण या संस्थेने प्रयोग केला. कोर्ट मार्शलमधून सत्याची उकल करणारे नाटक रसिकांना भावले. घरंदाज म्हणविणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वागणुकीचा समाचार घेण्यास संस्था यशस्वी झाली.  

काय आहे नाटक
कोर्ट-मार्शल या नाटकात कर्नल सूरजसिंह यांचा जीवनपट उलगडण्यात आला आहे. त्यांनी केलेला मिलिटरीतील कोर्ट-मार्शल. शिपाई- रामचंदर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडतो. त्यामध्ये कॅप्टन वर्मांचा मृत्यू होतो. कॅप्टन कपूर जखमी होतात. 

रामचंदर खून केल्याचेही कबूल करतो. पण खून नेमका का केला याचा उलगडा कोर्ट मार्शलमधून होतो. मेजर अजय पुरी व कॅप्टन बिकाश रॉय या खटल्याची छाननी करतात. साक्षीदार रामचंदरला वरिष्ठांकडून मिळालेल्या वागणुकीचे समर्थन करतात. शेवटी रामचंदर खरं सांगतो. कॅप्टन वर्मा व कॅप्टन कपूर जातीवरून खिल्ली उडवत असतात. कपूर यांनी त्याला मुलीचा संडासही काढायला लावला होता. त्या रात्री दुचाकीवरून जाताना त्यांनी गोरा भंगी, हरिजन, खालच्या जातीचे तसेच अश्‍लील शब्दात वाभाडे काढले. त्यामुळे मी गोळी झाडली. मी खून केला असे तो सांगतो. मेजर अजय पुरी कपूर यांच्या जिवाला धोका आहे असे सांगून त्यांना संरक्षणासाठी पिस्तूल देण्याची मागणी करतात. कर्नल सूरजसिंह पार्टीसाठी रामचंदरसह सर्वांना बोलावतात. त्यावेळी सूरजसिंह कपूर यांचा अपमान करतात. अपमान सहन  न झाल्यामुळे कपूर स्वतःवर गोळ्या झाडून घेतात. (कै.) डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठानने केलेला पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला.

     दिग्दर्शकाचे मत
(कै.) डॉ. काशिनाथ घाणेकर स्मृती प्रतिष्ठान, चिपळूण ही संस्था गेली बारा वर्षे नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी संस्थेतर्फे एकांकिका स्पर्धा, बालनाट्य शिबिरे घेत होती. चिपळूणला मोठा रंगमंच नसल्यामुळे कमतरता जाणवली. संस्थेने पुन्हा उभारी घेत राज्य नाट्य स्पर्धेत पहिलाच प्रयोग केला. 
- अभिजित काटदरे, दिग्दर्शक.

पात्र परिचय
कर्नल सूरजसिंग - रवींद्र रेपाळ, जज ॲडव्होकेट - अनिल सोमण, मेजर अजय पुरी - प्रसाद जोशी, कॅप्टन विकाश राय - समीर पाटणकर, ले. कर्नल रावत - मंगेश भावे, कॅप्टन कपूर - संदीप जोशी, कॅप्टन गुप्ता - सुयोग सहस्रबुद्धे, सुभेदार बलवान सिंह - प्रसाद सोमण,रामचंदर - ऋषीकेश चितळे, गार्ड १ - गिरीधर जाधव, गार्ड २ - अभिजित काटदरे

 सूत्रधार आणि सहाय्य
प्रकाशयोजना - उदय पोटे, नेपथ्य - अभिजित काटदरे, ध्वनी - स्वानंद रानडे, सुयोग सहस्रबुद्धे, ध्वनी सहायक - श्रेयस काळे, रंगभूषा - उमेश कुवेकर, वेशभूषा - आशीष चितळे, रंगमंच व्यवस्था - दिलीप नामजोशी, वैभव जोशी, निशिकांत पोतदार, गणेश घस्ते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com