बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या ‘कॅप्टन-कॅप्टन’ची बाजी

बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या ‘कॅप्टन-कॅप्टन’ची बाजी

रत्नागिरी - महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे रत्नागिरी केंद्रात जल्लोषात झालेल्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेत येथील बसणी पंचक्रोशी ग्रंथालय या संस्थेच्या कॅप्टन..कॅप्टन या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. कलावलय, वेंगुर्ला या संस्थेच्या ‘निखारे’ या नाटकास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून शासनाच्या नव्या आदेशानुसार दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

येथील सावरकर नाट्यगृहात ६ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा झाली. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांतील १९ नाटकांपैकी १५ संस्थांनी नाटकांमधून विविध विषय हाताळले. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

रत्नागिरी केंद्रावरील निकाल असा -

 साईकला क्रीडा मंच, सिंधुदुर्ग या संस्थेच्या ‘अशुद्ध बीजापोटी’ नाटकाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. दिग्दर्शन- प्रथम- मनोहर सुर्वे (कॅप्टन..कॅप्टन), द्वितीय- संजीव पुनाळेकर (निखारे). प्रकाशयोजना- संजय तोडणकर (कॅप्टन..कॅप्टन),  स्वानंद सामंत (निखारे). नेपथ्य- प्रवीण धुमक (कॅप्टन..कॅप्टन), किशोर कदम (भाविण), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक- ओंकार पाटील (कॅप्टन..कॅप्टन) व सानिका कुंटे (अशुद्ध बीजापोटी), अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र- अंकिता नाईक (भावीण), रूपाली परब (बिकट वाट वहिवाट), पल्लवी माळवदे (भाविण), सुलेखा डुबळे (अशुद्ध बीजापोटी), प्रसाद खानोलकर (निखारे), केदार देसाई (अशुद्ध बीजापोटी), रवींद्र रेपाळ (कोर्ट-मार्गल), महेश पाखरे (कुणी तरी आहे तिथं).

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्‍याम अधटराव, संदीप देशपांडे आणि डॉ. नयना कासखेडीकर यांनी काम पाहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com