रायगड मराठा संवाद यात्रेची पाचाड येथून सुरुवात

सुनील पाटकर
Wednesday, 21 November 2018

महाड  : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले तर हा मुद्दा हातातून निसटणार हे लक्षात आल्याने विरोधक ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. हि बाब मराठा समाजाच्या ध्यानात आली असुन सरकाला पाठबळ मिळावे यासाठी आणि दबाव निर्माण व्हावा यासाठी रायग़ड मराठा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
सकल मराठ क्रांती रायगड जिल्हाध्यक्ष विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (ता.21) रायगड मराठा संवाद यात्रेचा शुभारंभ पाचाडच्या जिजाऊ समाधीस्थळा वरुन करण्यात आला. या प्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे महाड तालुकाध्यक्ष डॉ चेतन सुर्वे, सुभाष निकम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बिपीन महामुणकर, भाजपा उपजिल्हाध्यक्ष राजेय भोसले, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश महाडीक आणि विविध ठिकाणचे मराठा मोर्चा तालुकाध्यक्ष उपस्थित होते. पाचाड येथुन महाड, माणगाव, पाली मार्गे या यात्रेचे खोपोली येथे सभेत रुपांतर होणार आहे. तसेच सरकारला पाठबळ देण्यासाठी आणि विरोधकांचा कट हाणून पाडण्यासाठी 26 नोव्हेंबरला मंत्रालय येथे धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
 
या संवाद यात्रेला मार्गदर्शन करताना विनोद साबळे यांनी मागासर्वगिय आयोगाचा योग्य अहवाल सरकारला सादर झाला असुन, मराठा आरक्षणा साठी सरकार सकारात्मक आहे. मात्र सदनात अधिवेश बंद पाडण्याचा विरोधकांचा कट आपण हाणून पाडू या असा निर्धार व्यक्त केला.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Maratha dialogue begins from Pachad