देवगडच्या आंबा व्यापाऱ्याचे आठ लाख रुपये लुटले

संभाजी थोरात
मंगळवार, 10 एप्रिल 2018

कोल्हापूर -  देवगडच्या आंबा व्यापाऱ्यास लुटण्याचा प्रकार आज सकाळी कोल्हापुर-गगनबावडा मार्गावर झाला. दत्तात्रय पाटणकर असे लुटले गेलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आजारी असल्याचे नाटक करत गाडी थांबवून तब्बल 8 लाख रुपये चोरट्यानी चाकूचा धाक दाखवून लंपास केले आहेत.

पाटणकर हे सोमवारी कोल्हापुरात आंबे घेऊन दाखल झाले होते. आंबे विक्रीनंतर ते गावाकडे जात असताना कोल्हापूर गगनबावडा रोडवर सैतवडे या गावाजवळ त्यांना लुटण्यात आले. त्यानंतर चोरटे जंगलात पसार झाले. या घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत श्वासनपथकाच्या सहायाने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. चोरट्यानी पाळत ठेऊन लुटल्याची शक्यता असून याप्रकरणी गगनबावडा पोलीस अधिक तपास करत आहेत

Web Title: Kolhapur News Devgad Mango trader gets looted