रत्नागिरी, देवगड हापूसला भौगोलिक मानांकन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

कोल्हापूर - रत्नागिरी व देवगड हापूस ला भौगोलिक मानांकन ( जीआय) मिळाले, असल्याची माहिती प्रा. गणेश हिंगमिरे यांनी दिली.

कोल्हापूर - रत्नागिरी व देवगड हापूस ला भौगोलिक मानांकन ( जीआय) मिळाले, असल्याची माहिती प्रा. गणेश हिंगमिरे यांनी दिली.

ते म्हणाले, फक्त त्याच विभागातील सर्व शेतकरी त्या विशिष्ठ नावाने आंबे विकू शकतील, कोकणातील अन्य शेतकरी हापूस हे नाव वापरू शकतील. इंडियन पेटंट ऑफिसच्या कंट्रोलर जनरलने हा आदेश दिला आहे. या आदेशामुळे आमच्या पाच वर्षांच्या लढ्याला यश मिळाले आहे असे ते म्हणाले.

रायगड, पालघर, ठाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूसला (अल्फान्सो)ला जी. आय. मानांकन मिळाले. देवगडचा हापूस आंबा देवगड हापूस या नावाने तर रत्नागिरीचा हापूस आंबा रत्नागिरी हापूस या नावाने आेळखला जाईल. रायगड, पालघर, ठाणेचा हापूस आंबा केवळ हापूस (अल्फान्सो) म्हणूनच आेळखला जाईल, असा निर्णय झाल्याची माहिती जीआयचे रजिस्टार आेमप्रसाद गुप्ता यांनी दिली असल्याचे प्रा. गणेश हिंगमिरे यांनी सांगितले. यामुळे ग्राहकांना व शेतकऱ्यांना दोघांनाही याचा फायदा होणार आहे. कोकणातील हापूसच आता यापुढे हापूस म्हणून आेळखला जाईल,.  असे श्री हिंगमिरे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News GI to Ratnagiri and Devgad Hapus