१९८९ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जुले ते ऑक्‍टोबर २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीचा फटका जिल्ह्यातील १६० गावातील १९८९ शेतकऱ्यांना बसला. यात शेती, फळपीक व शेतजमीन असे मिळून २६३ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी या बाधित क्षेत्राचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनास पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा व कृषी अधीक्षक विभागाचे कृषी यांत्रिकी अधिकारी अरुण नातू यांनी दिली. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुलै ते ऑक्‍टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. पावसामुळे शेती व बागायतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला एक पत्रक जारी करून तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत ५० टक्के किंवा त्यावरील नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने तो अहवाल शासनास पाठविण्याचे निर्देश दिले होते. यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने तालुका कृषी अधिकाऱ्यांतर्फे शासन निर्देशाच्या अधिन राहून अहवाल देण्याची सूचना केली होती. यानुसार हा अहवाल प्राप्त होऊन त्यामध्ये जुलै ते ऑक्‍टोबर या चार महिन्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा १६० गावांना फटका बसला असून १९८९ शेतकऱ्यांचे शेती क्षेत्र बाधित झाले आहे. त्याचे एकूण २६३ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची नोंद यात करण्यात आली आहे. यामध्ये भातशेती नुकसानीचा जादा समावेश असून या पिकाचे २६१.१ हेक्‍टर क्षेत्र एवढे नुकसान झाले आहे. तर त्याची शेतकरी संख्या १९५८ एवढी आहे. फळपिकामध्ये १४ गावांतील २७ शेतकऱ्यांचे १ हेक्‍टर ३१ गुंठे एवढे क्षेत्र बाधित झाले आहे. तर २ गावातील ४ शेतकऱ्यांचे ५० गुंठे क्षेत्र वाहून व खरडून गेले आहे. 

मार्चपर्यंत नुकसानभरपाई
दरम्यान, राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे केलेल्या नुकसानीच्या अहवालात देवगड, मालवण व वेंगुर्ला या तीन तालुक्‍यामध्ये जुलै ते ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या पावसाचा फटका बसला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर कणकवली तालुक्‍यात २२.६ हेक्‍टर, वैभववाडी १३.२८, सावंतवाडी ४.७३, दोडामार्ग ३५.६, वेंगुर्ला १८५ हेक्‍टर असे एकूण २६१.२१ हेक्‍टर भातपिकाचे ११९ गुंठे फळपिकाचे तर ५७ गुंठे जमिनीचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई मार्चपर्यंत मदत मिळण्याची शक्‍यता आहे.

Web Title: 1 9 9 8 farmers most affected Showers