मंगलोर एक्सप्रेसमध्ये 1 कोटी 88 लाखाचा डल्ला

1 crore 88 lakhs theft in Mangalore Express
1 crore 88 lakhs theft in Mangalore Express

महाड- मंगलोर एक्सप्रेसने मुंबईहून मंगलोर प्रवास करणाऱ्या एका सराफाच्या नोकराकडील 1 कोटी 88 लाख रूपयांचा ऐवज असलेली बँग चोरट्यांने लंपास केली आहे. सोन्याची साठ बिस्किटे व पाच लाख रुपयांची रोख रक्कम या बँगेत होती ती सर्व चोरीला गेली आहे.

कोकण रेल्वेमार्गावर 23 सप्टेंबरला पहाटे वीर ते माणगाव स्थानका दरम्यान ही घटना घडली. आज 27 सप्टेंबरला महाड तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर रात्रीचा प्रवास सद्या धोकादायक बनला आहे. काँसिंग दरम्यान प्रवाशांचे दागीने लंपास करणे, बॅगा पळवणे, गुंगीचे औषध देऊन सामान चोरी करणे असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. परंतू याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष करत असल्याने या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

23 सप्टेंबरला पहाटे मुंबई गोंवडी येथील सौरभ फत्तेलाल जैन ( वय 23) हा मंगलोर एक्सप्रेस मधून प्रवास मंगलोरकडे करत होता. मुंबईतील प्रसिद्ध सराफ चिराग जैन यांचा सौरभ लांबचा नातेवाईक असून गेल्या दोन महिन्यांपासून तो त्यांच्याकडे कामाला आहे. सौरभ मंगलोर येथील सोनारांना सोने पुरवण्याचे काम करतो.

माणगाव ते वीर दरम्यान फ्रेश होण्याकरीता तो आपल्या आसनावरून वाँशबेसिनकडे गेले असता या संधीचा फायदा घेत अज्ञात चोराने त्यांच्या बॅगेवर डल्ला मारला.  एकूण 1 कोटी 88 लाख रूपयाचा ऐवज होता. सदर बॅग लंपास झाल्याचे लक्षात येताच जैन यांनी रत्नागिरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर आज दिनांक 27 सप्टेंबरला महाड तालुका पोलिस ठाण्यात तपासाकरीता तक्रार वर्ग केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग पुढील तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com