सावर्डेत धाड टाकून १० लाखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

रत्नागिरी - सावर्डे (ता. चिपळूण ) येथील एका व्यापाऱ्याच्या गोदामावर धाड टाकून १० लाख २७ हजार ६४० रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. 

व्यापारी जितेंद्र मनोहर कोकाटे (वय ३८) यांच्या गोदामात अन्न व औषध प्रशासन अधिकारी पी. पी. गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकली. कोकाटेंच्या गोदामात बेकायदेशीर गुटखा आणि सुगंधी सुपारीचा साठा केल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून ही धाड टाकली.

धाडीमध्ये विमल पानमसाला ६०० पॅकेट (८४ हजार रुपये), महेक सिल्व्हर पान मसाला पॅकेट १५६ (१५,६००), एम. आय. जर्दा २४ पॅकेट (९६०), गोवा पान मसाला २७८४ पॅकेट (३ लाख ३४ हजार ८०), बॉस पाकिटे ८७७ (८७ हजार ७०० रुपये), गोवा प्रीमियम १००० ची ४९२ पॅक पाकिटे (८८ हजार ५६० रुपये), गोवा १०००- ३२८ पॅक पाकिटे (३९ हजार ३६०), राज कोल्हापुरी ४१० पॅक पाकिटे (१ लाख २३ हजार ४००), एक्‍सएक्‍सएक्‍स सात जर्दा १४४० पाकिटे (एक हजार ४४०), सुलतान पॅक पाकिटे ९३५ (९३ हजार ५००) असा १० लाख २७ हजार ६४० रुपयांचा माल जप्त केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 lakh rs gutaka seized in Sawarde