भाजपतर्फे 10 हजार वृक्षलागवडीस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

कणकवली : राज्य सरकारच्या 2 कोटी वृक्षलागवड मोहिमेत सिंधुदुर्गातील भाजप पक्ष संघटनादेखील सहभागी झाली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत येत्या आठ दिवसांत 10 हजार रोपांची लागवड होईल तसेच त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. 

कणकवली : राज्य सरकारच्या 2 कोटी वृक्षलागवड मोहिमेत सिंधुदुर्गातील भाजप पक्ष संघटनादेखील सहभागी झाली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत येत्या आठ दिवसांत 10 हजार रोपांची लागवड होईल तसेच त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. 

कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात श्री. जठार यांच्या हस्ते वृक्षलागवड उपक्रमाचा प्रारंभ झाला. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र शेट्ये, संजय नकाशे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर्स, परिचारिका व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राज्यात आजच्या दिवशी दोन कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. यात भाजपचादेखील सहभाग आहे. जिल्हा भाजपच्या वतीने आम्ही 10 हजार वृक्षलागवड करणार आहोत. याचा प्रारंभ कासार्डे हायस्कूल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, नापणे धबधबा येथे केल्याची माहिती श्री. जठार यांनी दिली.
भाजपतर्फे प्रत्येक तालुक्‍यात तेथील तालुकाध्यक्षांच्या व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षलागवडीचा आज प्रारंभ झाला. प्रत्येक बूथच्या क्षेत्रात किमान 10 झाडे लावण्यात येणार आहेत तसेच त्यांचे संगोपनदेखील केले जाणार आहे. दरम्यान, आजच्या "डॉक्‍टर्स डे‘निमित्त श्री. जठार यांनी कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

जानवली नदी सक्षमीकरणासाठी दोन कोटी
जानवली नदीच्या पुनर्भरणासाठी राज्य शासनाने 2 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. या नदीच्या सक्षमीकरणासाठी 37 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांतून जस जसा निधी उपलब्ध होईल, तस तशी जलसंवर्धनाची कामे सुरू होणार असल्याची माहिती श्री. जठार यांनी दिली.

पीक विमा योजनेत आंबा, काजू
केंद्र शासनाने नवीन पीक विमा योजना सुरू केली आहे. यात आंबा आणि काजू पिकांचाही समावेश करण्यासाठी कृषी राज्यमंत्री राम शिंदे यांच्याशी नुकतीच चर्चा झाली. पुढील आठवड्यात याबाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करून काजू आणि आंबा पिकांचा केंद्राच्या योजनेत समावेश होणार असल्याचे श्री. जठार म्हणाले. पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या कर्जाच्या परतफेडीशी जोडली जाणार आहे. त्यानुसार शेतकरी, बागायतदारांचे नुकसान झाले तर त्यांच्या कर्जाची भरपाई शासन करणार आहे.. 

Web Title: 10 thousand Treeplantetion from BJP start