काही सुखद ! सावित्रीच्या 104 लेकींसाठी मिळवले पालकत्व 

104 Savitri Girls Obtained Guardianship Ratnagiri Marathi News
104 Savitri Girls Obtained Guardianship Ratnagiri Marathi News

मंडणगड ( रत्नागिरी ) - शिक्षणाची कवाडे मुलींना खुली करून देण्यासाठी ज्योतिबा फुले यांच्याबरोबर अत्यंत तडफेने समाजाशी संघर्ष केला. म्हणून आजच्या शिक्षण घेणाऱ्या साऱ्या सावित्रीच्या लेकी. अशा या लेकी शिकाव्यात, म्हणून आतापर्यंत सावित्रीच्या 104 लेकींसाठी पालकत्व मिळविण्याची कामगिरी पुंडलिक शिंदे या शिक्षकांनी केली आहे. 

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेत 3 हजार रक्कम भरून एका मुलीला आठवीपर्यंत शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. पुंडलिक शिंदे यांनी याची मोहीमच राबविली. 4 डिसेंबर 1996 ला कुडुक बु. कबरगाणी शाळेवर ते रूजू झाले. तेथील पार्वतीबाई सुडकाजी गमरे या माऊलीने शिक्षकांना फारच जीव लावला होता. त्यांच्या निधनानंतर शाळेतील 4 शिक्षकांनी प्रत्येकी 750 रुपये याप्रमाणे 3 हजार या योजनेत शाळेसाठी दिले. जुलै 2011 मध्ये केंगवळ शाळेत ग्रामस्थ स्वतः तीन हजार रुपये घेऊन हजर झाले. प्रकाश दर्गे यांनी 9 हजार पाठवून दिले. त्यांचे मुंबईतील मित्र, वेसवीचे संजय मांडवकर, विजय मांडवकर हेही दत्तक पालक बनले. लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने शिंदेनी माहितीपत्रक आणि शाळेचे आवाहनपत्र छापून घेतले. संभाव्य दत्तक पालकांशी संपर्क सुरू केला. केंगवळ शाळेत मुली मोजक्‍याच होत्या. 

तीन हजार हाती देऊन श्रीगणेशा.. 

शिपोळे नं. 1 शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून आल्यानंतर नवीन कार्यक्षेत्र मिळाले. व्हॉट्‌स ऍप आणि फेसबुकसारखी माध्यमं हाताशी आली होती. फेसबुकवरील पोस्ट वाचून जुना कॉलेज मित्र शरद गावकर याने मुंबईत बोलावून घेतले. तीन हजार हाती देऊन श्रीगणेशा केला. आता शिंदे हे मुंबईत त्यांच्याकडे जातात, तेव्हा ते पुन्हा नव्या मुलींसाठी देणगी देतात. 

शालेय विद्यार्थीच बनले दत्तक पालक 

बाणकोट येथील तत्कालीन शिक्षकमित्र मोहन उपाध्ये यांना ही योजना आवडली. अध्यापना दरम्यान त्यांनी सहज मुलांजवळ विषय काढला असता, मुलांनी तो विषय उचलून धरला आणि वर्गातील सर्वांनीच उत्स्फूर्तपणे निधी जमा केला. अशा तऱ्हेने शालेय विद्यार्थीच दत्तक पालक बनले. आतापर्यंत 104 पालकत्वासाठी 3 लाख 12 हजार रुपये निधी जमा केले. 

50 दत्तक पालक
आतापर्यंतच्या प्रवासात खूप चांगले अनुभव आले. वयाच्या पन्नासाव्या वर्षात नव्याने 50 दत्तक पालक मिळवून शतकोत्तर अर्धशतक करण्याचा मानस आहे. निधी देणाऱ्यांना स्वतः तयार केलेले आभार पत्र मी देतो. 
- पुंडलिक शिंदे, पदवीधर शिक्षक  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com